80 years old man viral video : म्हातारपण हे दुसरे बालपण असते, असे म्हटले जाते. लहानपणी आई-वडील ज्या प्रेमाने आणि काळजीने आपले संगोपन करतात, त्याचप्रमाणे त्यांच्या उतारवयात त्यांचा आधार बनणे ही मुलांची जबाबदारी असते. मात्र, आजच्या धावपळीच्या आयुष्यात संसार आणि कामाच्या व्यापामुळे अनेकांची आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे पुरेशी काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होते. तरीही काही मुले अशी असतात, जी श्रावणबाळाप्रमाणे आई-वडिलांची मनापासून सेवा करतात आणि त्यांच्या म्हातारपणात आनंद व समाधान देण्याचा प्रयत्न करतात.
@bhukkhad_musafir या इन्स्टाग्राम युजरच्या वडिलांनी यापूर्वी कधीही समुद्र पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठीच तो त्यांना समुद्रकिनाऱ्यावर घेऊन आला होता. आजोबांनी समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाजवळ येताच हात जोडून नमस्कार केला. त्यांची ही साधीशी कृती निसर्गाबद्दलची त्यांची आपुलकी, कृतज्ञता आणि आदरभावना दाखवून देते होती. समुद्राचे विशाल रूप पाहून भारावलेल्या वडिलांच्या तोंडून “आयुष्यात इतकं सुंदर दृश्य मी कधीच पाहिलं नव्हतं. स्वप्नातही असा समुद्र पाहण्याचा विचार केला नव्हता” असे शब्द देखील निघतात; जे ऐकून तुमचे मन भारावून जाईल.
‘काही आनंदाच्या क्षणांना वयाचे बंधन नसते’ (Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bhukkhad_musafir या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आजोबांच्या आयुष्यातील खास क्षण व्हिडीओद्वारे शेअर करत “वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच समुद्र पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य, डोळ्यांत लहान मुलासारखी निरागसता होती. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतात. माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरचे हे हास्य हीच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे” ; अशी कॅप्शन लेकाने व्हिडीओला दिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
नेटकरी देखील व्हिडीओ पाहून “कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समुद्रासमोर हात जोडून निसर्गाला नमन करणे ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. त्यांना निसर्गाचे खरे मूल्य समजते आणि निसर्ग ही जीवनातील सर्वात मौल्यवान देणग्यांपैकी एक आहे, याची त्यांना जाणीव आहे”, ” आजोबाना हात जोडून समुद्रासमोर नतमस्तक होताना पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले”, “ही कदाचित अशी शेवटची पिढी आहे जी खऱ्या अर्थाने मातीशी जोडलेली आहे; जी सोशल मीडियाच्या प्रभावापासून दूर असून निसर्ग आणि साधेपणाशी घट्ट जोडलेली आहे”, “हे दृश्य मनाला खूप भावणारे आहे”, “निसर्गाला नमस्कार करणारी ही शेवटची पिढी” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.
