Viral Video: वारंवार सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. ज्यातील काही व्हिडीओ व्ह्यूज आणि लाइक्ससाठी ठरवून शेअर केले जातात. तर काही व्हिडीओ नकळत शूट केलेले असतात, जे सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळवतात. अशा अनेक व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते. सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध व्यक्तीचा बाईक चालवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये त्यांच्या मागे श्वानदेखील दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देत आहेत. श्वान हा अनेकांचा आवडता प्राणी आहे. खेडेगावात प्रत्येक व्यक्तीच्या घरात एक तरी श्वान असतोच. या लाडक्या प्राण्याला घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम, माया दिली जाते, त्यामुळे तो देखील घरातील व्यक्तींबद्दल प्रामाणिक असतो. घरातील सदस्यांवर इतरांप्रमाणेच हक्क दाखवतो; अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ आजपर्यंत आपण पाहिले आहेत. आतादेखील असाच एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक श्वान आपल्या मालकाबरोबर बाईकवर डबलसीट बसून जात असल्याचे दिसत आहे. यावेळी एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट करून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असणाऱ्या "आप्पाचा विषय लय हार्ड" या गाण्यासह सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक श्वानप्रेमी मालक आणि श्वानाच्या बाँडिंगचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adityawakchaure_या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. हेही वाचा: ‘तुझ्या आईचं काय होईल…’ सोशल मीडियावरील रीलसाठी तरुणाचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका पाहा व्हिडीओ: https://www.instagram.com/reel/C-USVY7yS7Q/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== युजर्सच्या कमेंट्स चर्चेत एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “हा श्वान आप्पाचा बॉडीगार्ड आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “आप्पाचा नाद खुळा”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “आप्पा सापडले मित्रांनो”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हे गाणं या व्हिडीओला एकदम सूट होतंय”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप छान वाटलं हा व्हिडीओ पाहून.”