Viral video: एखाद्या गोष्टीप्रती असणारी आवड किंवा मग त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन याच्या आड कधी वयाचा आकडा येता कामा नये, हा सिद्धांत अनेकजण पाळतात. अशाच सिद्धांताचं पालन करणाऱ्या काकी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.आजकाल डान्स म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्या प्रमाणे डान्स करत आहे, ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.
अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. त्यांना सतत दुसऱ्यांच्या राहणीमानाचं आणि त्यांच्या आरामदायी जीवनाचं कौतुक वाटतं. शिवाय श्रीमंत मित्रांच्या तुलनेत आपण खूपच कमी असल्याची तक्रार ते खासगीत करत असतात. मात्र, आपल्या आजुबाजूला काही लोक असेही असतात जे कोणत्याही तक्रारी न करता आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतात. अशाच एका आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आयुष्यात प्रत्येक छोट्या गोष्टीत आनंद शोधला की समाधान आपोआप मिळतं हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे.
यामध्ये हे आजोबा एका कार्यक्रमात जेवण बनवताना डान्स करत आहे. त्यांचं शरीर थकलं असलं तरी त्यांच्यातला उत्साह हा तरुणांना लाजवेल असाच आहे. या वयात दुखण्यानं रडत बसण्यापेक्षा आजी छान डान्स करत आहेत. हा व्हिडीओ पाहून सर्वच आजीचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, देवीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरु आहे आणि या आजी जेवण बनवण्याचं काम दुसऱ्या बाजूला करत आहेत. मात्र जागरण गोंधळातल्या गाण्यांचा आवाज ऐकून त्याही स्वत:ला रोखू शकल्या नाही. त्या तिथेच नाचू लागल्या. शेजारी आणखी एक आजीही दिसत आहेत त्यासुद्धा टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत आहेत. आजचाच दिवस शेवटचा, क्या पता कल हो ना हो..असं म्हणत या आज्जी त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा पुरेपुर आनंद घेत आहेत.
पाहा व्हिडीओ
aapli_prajjkta नावाचं इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनहा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “चेहऱ्यावरची स्माईल सांगत आहे की मी किती आनंद आहे…जीवनात वन्समोर नाही आहे तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा…” तर आणखी एकानं “हा आनंद विकत घेणं शक्य नाही…” अशी प्रतिक्रिया दिली आहे.