elderly women dance in haldi programme viral video : जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे आयुष्य. त्यामुळे हे आयुष्य विचार करत, टेन्शन घेत, दु:खात घालवायचं की, प्रत्येक छोट्या गोष्टीत समाधानी आणि आनंदी राहायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. कारण- दु:ख प्रत्येकाच्या वाट्याला येतं. पण, त्यावर मात करून जो आनंद शोधतो, तोच खऱ्या अर्थानं आयुष्य जगतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ असंच काहीसं दाखवतो आहे, ज्यामध्ये आजीनं हळदीत नाचताना स्वतःचा आनंद शोधला आहे.

लग्नामुळे केवळ दोन जीव नव्हे, तर दोन कुटुंबं एकत्र येतात. त्यामुळे लग्नातील प्रत्येक कार्यक्रम एखाद्या उत्सवासारखा साजरा केला जातो. अगदी हळदीत तर गाणं, डान्स आणि मजा-मस्ती यातील कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. तर, सध्या हळदीच्या कार्यक्रमातील एका आजीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये बँजोच्या तालावर आजी ठेका धरून नाचते आहे. तिचा या वयातील उत्साह अगदी तरुण मंडळींना लाजवेल असा आहे. पाहणाऱ्यांचं मन जिंकणारा हा व्हिडीओ सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.

एका बाजूला बँजोचा भन्नाट ताल आणि दुसऱ्या बाजूला त्या तालावर मनमुराद ठेका धरून नाचणारी आजी. बँजोवाल्यांच्या तालावर हात वर करून, कोण काय म्हणेल याची अजिबात पर्वा न करता, आजी ज्या उत्साहात नाचते आहे. ते खरंच प्रेरणादायी आहे. या वयातही तिची नाचण्याची आवड किंचितही कमी झालेली नाही. उलट प्रत्येक ठेक्यासोबत तिचा चेहरा अधिक खुलल्याचे दिसते. आयुष्यात स्वतःला काय आवडतं, हे जपणं किती महत्त्वाचं असतं याचं हे सुंदर उदाहरण म्हणावं लागेल.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @dapolikar_vedant’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘प्रत्येक क्षण आनंदानं जगता आला पाहिजे. हे ह्या आजीकडून शिकलं पाहिजे’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीदेखील व्हिडीओ पाहून “आमची अंनी”, “आजी ऑन फायर”,”आजीचा डान्स जबरदस्त आहे”, “आमच्या गावची काकी”, “आजी गौतमी पाटीलपेक्षा चांगली नाचते”, “बघतंच राहावंसं वाटतंय आजीला” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसून आलै आहे.