हत्ती लहान असो वा मोठा तो आपल्याला क्युटच वाटतो. शक्यतो हत्ती कितीही अवाढव्य असला तरी सहसा तो विना कारण माणसांवर हल्ला करत नाही. बहुतेक वेळा तो शांतच असतो. पण एकदा का हत्ती चवताळला तर हाच शांत हत्ती भडकतो आणि त्यानंतर मात्र त्याला आवरणं कठीण नाही अशक्यत असतं. अशाच एका चवताळलेल्या हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्याने चक्क एका कारला भररस्त्यात अडवलं. त्यानंतर त्याने कारसोबत काय केलं हे पाहणं फार मनोरंजक असणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, हत्ती रस्त्यावर एक कार थांबवतो आणि त्याच्या बोनेटने आपली पाठ खाजवू लागतो. त्यानंतर तो गाडीच्या वर बसतो. आता तुम्ही विचार करत असाल की गाडीच्या आत बसलेल्या व्यक्तीचे काय होईल? पण हत्तीही पुढच्याच क्षणी खाली उतरतो. पण वजनामुळे गाडीच्या पुढील भागाची काय अवस्था झाली असेल हे व्हायरल व्हिडीओ पाहून अंदाज लावू शकतो. त्याचबरोबर कार चालकाचा जीवही मोठ्या मुश्किलीने वाचला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेत्याने उद्घाटनाची फीत कापताच नवाकोरा पूल पत्त्यासारखा कोसळला!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कुत्रा विरूद्ध पाणकुत्रा, पाहा कुणी मारली बाजी, हा गोंडस VIRAL VIDEO पाहून मन प्रसन्न होईल

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर Buitengebieden नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जेव्हा हत्तीला खाज सुटते तेव्हा बघा काय करतो. एक दिवसापूर्वी अपलोड केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २४ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत, तर ४८ हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

आणखी वाचा : स्वावलंबी आजी! मुंबई लोकलमध्ये चॉकलेट विकून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल!

एका युजरने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘हत्तीने नक्कीच जाहीरात पाहिली असेल, त्यानंतर तो स्वतःहून प्रयत्न करण्याचा विचार केला असेल’..’ दुसऱ्या यूजरने कमेंट करत लिहिले, ‘आता कल्पना करा, कार चालक विमा एजंटला माणूस कसा दावा करेल या घटनेबद्दल कसं सांगेल?.’ एकंदरीत हा व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत.