scorecardresearch

Pre Wedding Photoshoot दरम्यान हत्तीने घातला धिंगाणा; नेमके काय घडले पाहा Viral Video

प्री वेडिंग फोटोशूट दरम्यान हत्तीला राग अनावर झाला अन पुढे काय झाले पाहा

Pre Wedding Photoshoot दरम्यान हत्तीने घातला धिंगाणा; नेमके काय घडले पाहा Viral Video
एका प्री वेडिंग फोटोशूटचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे (फोटो: सोशल मीडिया)

सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू आहे. लग्नातील गमती जमती, वेगवेगळे कार्यक्रम, खरेदी, डान्स या सर्व गोष्टींची धमाल सर्वत्र पाहायला मिळत आहे. यातीलच सर्वांचे आकर्षण ठरणारी गोष्ट म्हणजे ‘प्री वेडिंग फोटोशूट’. सध्या वेगवेगळ्या ठिकाणी, हटके कल्पना वापरून प्री वेडिंग फोटोशूट करण्याचा ट्रेंड सुरू आहे. याचे अनेक फोटोही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असेच एक फोटोशूट सध्या चर्चेत आहे. पण याचे कारण मात्र वेगळे आहे, फोटोशूट दरम्यान तिथे उपस्थित असणाऱ्या हत्तीला राग अनावर होताच त्याने एका माणसाला उचलून आपटल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ केरळमधील आहे. यात एक जोडपं प्री वेडिंग फोटोशूट करत असल्याचे दिसत आहे. पण त्याचवेळी तिथे एक अनपेक्षित घटना घडते. तिथे उपस्थित असणारा हत्तीचे फोटोशूट दरम्यान रागावरील नियंत्रण सुटते आणि हा हत्ती तिथल्या एका माणसाला सोंडेने उचलून जोरात खाली आपटतो. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असणारे सर्वजण थक्क होतात. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : शेजाऱ्यांनी चक्क घरच खांद्यावर उचलून घेतले अन्…; कारण जाणून तुम्हालाही वाटेल कौतुक

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्राण्यांना त्रास दिल्याने ते अशा प्रतिक्रिया देतात असे काहीजणांनी कमेंटमध्ये म्हटले आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये फोटोशूट दरम्यान हत्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 18:57 IST

संबंधित बातम्या