scorecardresearch

हत्तीने रस्ता कसा ओलांडायचा ते पिल्लाला कसे शिकवले पाहा; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं

Viral Video: रस्ता कसा ओलांडायचा ते हत्तीने पिल्लाला कसे शिकवले पाहा

Viral Video Elephant Teaches Calf How to Cross Road IAS Officer Says Its A Sad Reality
व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये प्राण्यांचेही बरेच व्हिडीओ असतात. प्राण्यांचे गोंडस हावभाव दाखवणारे तर काही वन्य प्राण्यांचे रौद्र रूप दाखवणारे असे व्हिडीओ असतात. जंगलात माणसांनी त्यांना हवा तसा बदल केल्यामुळे प्राण्यांना त्यांच्या घरात मुक्तपणे वावर करणे कठीण जाते, हे आपल्याला बऱ्याच व्हिडीओमधून समजते. या प्राण्यांना मग पिल्लांना देखील या बदलाशी जुळवून घेण्यास शिकवावे लागते. असाच पिल्लाला मार्गदर्शन करतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती त्याच्या पिल्लाला रस्ता कसा ओलांडायचा ते शिकवत असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे दुखापत होऊ शकते याचा अनुभव असणारा हत्ती पिल्लाला रस्ता ओलांडण्यापुर्वी डावीकडे आणि उजवीकडे बघायचे याचे जणू प्रशिक्षण देत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: दारू पिऊन मुंबईकर तरुणीने बंगळूरमधून बिर्याणी केली ऑर्डर; झोमॅटोचं बिल पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा: मालकाला दुसऱ्या कुत्र्याचे लाड करताना पाहिले अन्…; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

या गोंडस व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत, पण काहींनी मात्र यावर हे आपलं दुर्दैव असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. ‘प्राण्यांना जंगलात देखील स्वातंत्र्य नाही, आपल्या हस्तक्षेपामुळे त्यांना पिल्लांना देखील या गोष्टी शिकवाव्या लागत आहेत’, अशा कमेंट्स काही जणांनी केल्या आहेत. सुप्रिया साहू यांनी देखील व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये हे दुर्दैवी सत्य असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 11:18 IST
ताज्या बातम्या