अमेरिकन फ्लाइटचा एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकेतील सार्वजनिक वाहतूक (ट्रेन-बस-फ्लाइट) मध्ये फेस मास्कचा अनिवार्य वापर समाप्त करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर फ्लाइटमधील प्रवासी आनंद व्यक्त करत आहेत. दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेला हा व्हिडिओ लोकांना खूपच आवडला आहे. हा व्हिडीओ डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाचा आहे.

या व्हिडीओमध्ये एक पायलट विमानातील प्रवाशांसाठी एक घोषणा जाहीर करतो. या त तो म्हणतो सार्वजनिक वाहतुकीसाठी मास्क अनिवार्य नाही आणि त्यामुळे मास्क घालणे आता ऐच्छिक आहे. जेव्हा पायलटने प्रवाशांना ही माहिती दिली तेव्हा फ्लाइटमध्ये बसलेले अनेक प्रवासी त्यांचे मास्क उतरवतात आणि टाळ्या वाजवून निर्णयाचं स्वागत करतात.

आणखी वाचा : घरट्याजवळून जाणाऱ्या महिलेवर बदकाने अचानक केला हल्ला, मग काय झालं, पाहा VIRAL VIDEO

हे लक्षात घेण्यासारखे आहे की अमेरिकेत यापुढे फ्लाइट, मेट्रो, ट्रेन किंवा बसमध्ये मास्क घालणे बंधनकारक असणार नाही. अमेरिकेतील एका न्यायालयाने सार्वजनिक वाहतुकीसाठी कोविड मास्कचा अनिवार्य नियम रद्द केला आहे. फ्लोरिडा न्यायालयाने आपल्या आदेशात मास्क घालणे अनिवार्य करण्याच्या १४ महिन्यांच्या जुन्या निर्णयाचे समर्थन केले नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या कुत्र्याने पाहा काय केलं?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नागिन डान्सनंतर आता मार्केटमध्ये आला ‘आर्मी’ डान्स, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने लादलेली सार्वजनिक वाहतुकीसाठी कोविड-19 मास्कची अट सोमवारी अमेरिकेतील एका फेडरल न्यायाधीशाने रद्द केली. फ्लोरिडाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या यूएस जिल्हा न्यायाधीश कॅथरीन किमबॉल मिझेल यांनी सांगितले की मास्कची आवश्यकता सीडीसीच्या वैधानिक अधिकाराच्या बाहेर आहे.

CDC ने अलीकडेच करोना प्रकरणांमध्ये वाढ होत असताना विमान, भुयारी रेल्वे, ट्रेन, बस आणि सार्वजनिक वाहतुकीच्या इतर साधनांमध्ये प्रवास करताना फेस मास्कची आवश्यकता ३ मे पर्यंत वाढवली आहे.