Viral Video Police Arresting CJP Protest Students : नीट पेपरफुटी प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर-मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांचा विजय झाला असून, त्यानिमित्त २६ जुलै रोजी दादरमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोषदेखील साजरा करण्यात आला. पण, सध्या लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला. सीजेपी (CJP) आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची ओळख पटवून, पोलीस त्यांना अटक करीत असल्याचा दावा व्हिडीओ व कॅप्शनमधून केला जातो आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा असून, हा व्हिडीओ जुना व असंबंधित आहे.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (ट्विटर) युजर @priainc यांनी हा व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला.
इतर युजर्सदेखील दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह असाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास
आम्ही व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपासाला सुरुवात केली.
त्यातून आम्हाला ‘द जामिया टाइम्स’ (The Jamia Times) या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरील १४ फेब्रुवारीच्या एका पोस्टची माहिती मिळाली.
हा व्हिडीओ व्हायरल व्हिडीओसारखाच होता.
कॅप्शनमध्ये म्हटले होते की, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) सदस्यांनी आरोप केला आहे की, मॉरिस नगर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना धमकावण्यात आले आणि त्यांना शिवीगाळ करण्यात आली.
त्यानंतर आम्ही कॅप्शनचा वापर करून कीवर्ड सर्च केला.
आम्हाला या घटनेबाबतचा एक वृत्त अहवालही सापडला.
https://theprint.in/india/aap-questions-centres-silence-over-alleged-abuse-of-aisa-women-leaders-in-delhi/2855805
या बातमीत म्हटले आहे की, आम आदमी पक्षाने (AAP) दिल्ली पोलीस ठाण्यात ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ने (एआयएसए) महिला नेत्यांवर झालेल्या कथित गैरवर्तनाच्या घटनेवरून मोदी सरकारचा निषेध केला आणि ‘सत्ताधाऱ्यांच्या शांततेवर’ प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दुसऱ्या एका बातमीत म्हटले आहे की, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) आणि इतर विद्यार्थी संघटनांनी यूजीसी (UGC) सोशल इक्विटी रेग्युलेशन्सवरील स्थगितीच्या विरोधात हे आंदोलन आयोजित केले होते, जे उच्च शिक्षणातील जातीय भेदभाव दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे एससी/ एसटी/ओबीसी (SC/ST/OBC) समुदायातील अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या नियमांबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
https://maktoobmedia.com/public/post?id=113053&slug=aaps-sanjay-singh-slams-delhi-police-says-aisa-women-leaders-were-told-to-take-off-clothes-inside-police-station
ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने (AISA)देखील याबाबत एक निवेदन दिले आहे.
निष्कर्ष
सीजेपी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पोलीस अटकेसंबंधीचा हा व्हायरल व्हिडीओ चुकीच्या डाव्यांसह शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ दिल्लीच्या मॉरिस नगर पोलीस ठाण्यात AISA च्या सदस्यांशी संबंधित फेब्रुवारी महिन्यातील घटनेचा आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.
