Fact Check Viral Video: लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलेला एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये पोलिस एका गटाला मारहाण करताना दिसत आहेत. त्याद्वारे पोलिस मुस्लिमांच्या गटाला मारहाण करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, तपासादरम्यान, आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ जुना आहे आणि पोलिस समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना दिसत आहेत.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर जनार्दन मिश्राने त्याच्या प्रोफाइलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड केला आणि नंतर व्हिडीओमधील कीफ्रेम्स मिळवल्या. त्यानंतर आम्ही त्यावर एकामागून एक रिव्हर्स इमेज सर्च केली.

त्यानंतर आम्हाला १३ एप्रिल २०२५ रोजी UPPOLICE FACT CHECK ची एक पोस्ट सापडली.

“हा व्हिडीओ २०२० चा आहे, ज्यामध्ये जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करताना कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी आवश्यक बळाचा वापर केल्याचे दाखवले आहे. कृपया पडताळणीशिवाय दिशाभूल करणारी पोस्ट करून अफवा पसरवू नका” असे पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे.

या पोस्टने यूपी तकवर अपलोड केलेल्या व्हिडीओची लिंकदेखील शेअर केली आहे.

हा व्हिडीओ चार वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. ज्यात म्हटले आहे, “नीट-जेईई परीक्षा पुढे ढकलल्याबद्दल सकाळपासून लखनौमध्ये गोंधळ सुरू आहे. समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते राज्यपालांच्या घरासमोर जमले आणि बॅनर व पोस्टर्ससह सरकारविरुद्ध घोषणाबाजी करू लागले.”

आम्हाला या घटनेबद्दल बातम्यादेखील मिळाल्या

https://www.hindustantimes.com/education/jee-mains-neet-2020-row-sp-youth-wing-activists-lathi-charged-during-protest/story-MHgViyWqDhijXqeerIl3yI.html/elections/karnataka-assembly-election

https://www.india.com/education/jee-neet-2020-lucknow-police-resorts-to-lathi-charge-against-samajwadi-party-workers-protesting-september-exams-4126947

अहवालात नमूद केले गेलेय की, कोविड-१९ साथीच्या आजारादरम्यान मंगळवारपासून अखिल भारतीय संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) आणि राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) घेण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या (SP) विद्यार्थी संघटनेच्या ‘समाजवादी छात्र सभे’च्या सदस्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सोमवारी लाठीमार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष:

२०२० मध्ये समाजवादी छात्र सभेच्या कार्यकर्त्यांवर यूपी पोलिसांनी लाठीमार केल्याचा व्हिडीओ वक्फ निदर्शनांशी जोडला जात असल्याने तो व्हायरल झाला आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.