Mother 50th Birthday Surprise Gift Viral Video : साडी म्हणजे तरुणी आणि महिलांचं पाहिलं प्रेम असतं. साडी नेसण्यासाठी कुठल्याही खास प्रसंगाची, समारंभाची आवश्यकता नसते. त्यामुळे साडीबद्दल प्रत्येकीच्या मनात एक विशेष स्थान असते. त्यामुळे खास करून लग्न झालेल्या महिलांना साडी गिफ्ट दिली की, त्यांच्या चेहऱ्यावर नकळत हसू येते. त्यातच गणेश उत्सव, दिवाळी असो किंवा लग्नकार्य महिला वर्गाची पहिली पसंती असते पैठणीलाच जाते. तर आज सोशल मीडियावर हेच दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
५० वा वाढदिवस म्हंटलं की, आपण हॉटेल बुक करतो. छान सजावट करून केक सुद्धा कापतो. पण, आईचा आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो, ५० व्या वाढदिवसाला एका कुटुंबाने पैठणी साडी भेट म्हणून दिली आहे. साडीचा रंग पाहून आई खुश तर झालीच. पण, साडीच्या आतमध्ये शिवून घेतलेला ब्लाउज पाहून ती आणखीन शॉक झाली. कुटुंबाने तिला सरप्राईज देण्यासाठी घेतलेले प्रयत्न तिला भरपूर आवडले आणि ती बराच वेळ साडी आणि त्या शिवलेल्या ब्लाउजकडे बघताना दिसली.
सरप्राईजची सुरवात अशी काहीशी झाली (Viral Video)
अनेकदा प्रेमाने आणलेलं गिफ्ट बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यातच साडी आणल्यावर आईला रंग आवडत नाही. माझ्याकडे हा रंग होता परत तोच आणलास असं ती हमखास म्हणते आणि मग गिफ्ट घेतलेल्या व्यक्तीला नकळत गिल्ट येतो. पण, व्हायरल व्हिडीओतील आईने अशी कोणतीच गोष्ट केली नाही. तिला पैठणी साडी आणि तिचा रंग दोन्हीही आवडला आणि त्यांचे हावभाव सुद्धा बघण्यासारखे होते. एकदा बघाच पैठणी साडी पाहिल्यावर आईने कशी रिॲक्शन दिली ते…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @i_am_akshata_raut या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘आईच्या ५०व्या वाढदिवसाच्या सरप्राईजची सुरवात अशी काहीशी झाली’ ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून ‘काकी आणि काकांचे एक्स्प्रेशन’, ‘ह्याला बोलतात सरप्राईज’, ‘किती तो आनंद’, ‘सुंदर आहे साडी आणि काकूंचा आनंद ही काकूंना रंग आवडला ते बरं झालं.. नाहीतर काही बायका माझ्याकडे होता हा रंग, दुसरा रंग नाही भेटला का वगैरे बोलतात..आणि गिफ्ट देणाऱ्याला रिटर्न गिफ्ट म्हणून गिल्ट देतात’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.
