scorecardresearch

Video: चित्ता कितीही वेगवान असुदे पण ‘इथे’ कासवंच जिंकलं; नेटकरी म्हणतात, आयुष्यात सगळं पाहिलं पण हे..

Viral Animal Video: कधी विचारही केला नसेल अशा दोन विरुद्ध टोकाच्या प्राण्यांची पिल्लं या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

Video: चित्ता कितीही वेगवान असुदे पण ‘इथे’ कासवंच जिंकलं; नेटकरी म्हणतात, आयुष्यात सगळं पाहिलं पण हे..
Viral Video fastest Cheetah and Turtle (फोटो: इंस्टाग्राम)

Viral Animal Video: मैत्रीला ना भाषेचं बंधन असतं ना श्रीमंतीचं ना जातीचं.. खरंतर सर्व बंधनांच्या पुढे जाऊन केलेली मैत्री ही खरी असं म्हंटलं जातं. पण दुसरीकडे जर घोड्याने गवताशी मैत्री केली तर तो खाणार काय असंही म्हंटलं जातं. या दोन्ही युक्तिवादांना साजेसं असं एक गोंडस उदाहरण सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कधी विचारही केला नसेल अशा दोन विरुद्ध टोकाच्या प्राण्यांची पिल्लं या व्हिडिओमध्ये खेळताना दिसत आहेत. सर्वात वेगवान चित्ता आणि दबक्या पावलाचा कासव यांच्या मैत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तुम्हाला उत्सुकता आहे ना? चला तर पाहुयात या प्राण्यांचा खेळ.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये कासवाच्या कवचावर डोके घासून एक चित्ता कासवासोबत खेळताना दिसत आहे. आपण पाहू शकता की कासव व चित्त्याचं बाळ एकमेकांसह मजेशीर खेळ खेळत आहे. विशेष म्हणजे लहान आकाराचा असला तरी चित्त्यासारखा प्राणी पाहून कोणताही अन्य छोटा जीव हा पळ काढतो पण या व्हिडिओतले बिनधास्त कासव अगदी निवांत बसून आपल्या मित्रासह खेळत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र अक्षरशः थक्क झाले आहेत.

Video: जंगलाचा खरा राजा कोण? वाघ आणि सिंह एकमेकांना भिडले अन्…जवळून पाहा ‘हा’ थरार

गेल्या आठवड्यात इंस्टाग्रामवर कार्सन स्प्रिंग्स वाइल्डलाइफने हा व्हिडिओ शेअर केला असून. पेन्झी व कासव दोघे छान मित्र झाले आहेत त्यांना भेटायला नक्की या. असे कॅप्शन दिले आहे. कार्सन स्प्रिंग्स हे युनायटेड स्टेट्समधील गेनेसविले, फ्लोरिडा येथील ना-नफा विदेशी प्राणी आणि नामशेष होणाऱ्या प्रजाती प्राण्यांचे रक्षण करणारे उद्यान आहे.

Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार

पाहा कासव व चित्त्याची मैत्री

या व्हायरल व्हिडिओला इंस्टाग्रामवर शेअर केल्यापासून १.१ मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि ५६,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेकांनी मजेशीर कमेंट करून “जेव्हा मला वाटलं की मी सगळं पाहिलंय तेव्हा हा अदभूत प्रकार समोर आला आणि थक्क करून गेला” असे म्हंटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या