Father And Daughter Dance Viral Video : प्रेम, काळजी हृदयात जपून ठेवणारे बाबा घरातील प्रत्येकाचा आधारस्तंभ असतात. त्यातच मुलगी म्हटली की, त्यांची हळवी बाजू. तिच्या आणि बाबांच्या नात्याबद्दल सर्वांनाच ठाउक असते. हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक असते असे म्हणतात. घरातील सगळ्या सदस्यांपेक्षा मुलगी ही त्यांची लाडकी असते. मुलांबरोबर कठोर वागणारा बाबा लेकीसमोर मात्र अगदी हळवा होऊन जातो आणि तिला आयुष्यातील प्रत्येक सुख देण्याच्या प्रयत्नात असतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
अक्षय पालीवाल म्हणजे बाबांनी हा व्हिडीओ @little_munchkin28 या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या लेकीला ‘बेबी कॅरियर’मध्ये बसवून डान्स करताना दिसत आहे. हा डान्स करण्यासाठी त्यांनी २००१ मधील लोकप्रिय चित्रपट ‘दिल चाहता है’ मधील ‘वो लडकी है कहाँ’ हे गाणं सुद्धा निवडलं आहे.जेव्हा बाबा गाण्याच्या तालावर नाचायला सुरुवात करतात, तेव्हा चिमुकली लेकही त्यांच्यासोबत रंगून जाते. कधी मान डोलावते, कधी आनंदाने ओरडते, तर कधी खळखळून हसत बाबांना प्रोत्साहन देते. बाप-लेकीच्या या गोड क्षणांनी तुमच्याही चेहऱ्यावर नकळत हसू फुलेल.
गाण्याच्या ओरिजिनल व्हिडीओमध्ये सैफ अली खान आणि सोनाली कुलकर्णी झळकले आहेत. शान आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेले ‘वो लडकी है कहाँ’ हे गाणे आजही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले जाते. तसेच हे गाणे प्रदर्शित होऊन दोन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरीही, हे गाणे आजही नवीन चाहत्यांना भुरळ घालत आहे असे म्हणायला हरकत नाही. या गाण्यावर सादर केलेला बाबा आणि लेकीचा सुंदर डान्स व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @little_munchkin28 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी देखील “बाळाचे हावभाव मन जिंकणारे आहेत”, “तुझे डान्स स्टेप्स इतके स्मूथ आहेत की मला वाटलं हा व्हिडीओ एआयने बनवलाय”, “बॅकग्राऊंडमधला लेकीचा तो ओरडण्याचा आवाज ऐकायला खूपच गोड वाटतोय”, “बाळ खूप खुश आहे आणि डान्सचा पूर्णपणे आनंद घेत आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
