Viral Video: जेव्हापासून लोक सोशल मीडियाचा मोठ्या वापर करू लागले आहेत तेव्हापासून हॉलीवूड, बॉलीवूड, तसेच भारतातील इतर विविध भाषांतील नवीन चित्रपट प्रदर्शित झाले की, त्यातील डायलॉग्ज, गाणी, डान्स स्टेप्सदेखील खूप चर्चेत येतात. मग काय सोशल मीडियावर अनेकांना त्या चित्रपटांतील डायलॉग्जवर रील्स बनविल्याशिवाय, तसेच अनेकांना त्यातील गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहवत नाही. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे ‘धुरंदर’ चित्रपटातील काही गाणी धुमाकूळ घालत आहे; तर दुसरीकडे “सज धज के में” हे गाणं खूप ट्रेंडिंग आहे. या गाण्यावर खूप युजर्स, अनेक कलाकार रील्स बनविताना दिसत आहेत; पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तिच्या लहानशा चिमुकलीला घेऊन सुंदर डान्स करताना दिसत आहे.

बाप आणि लेकीचे नाते नेहमी खूप खास असते. लेक आपल्या बाबांसाठी आणि बाबा आपल्या लेकीसाठी काहीही करायला तयार असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक व्यक्ती आपल्या लेकीला घेऊन ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भारतीय व्यक्ती आपल्या कुटुंबासह परदेशात फिरायला गेला असून यावेळी तो आपल्या चिमुकलीला घेऊन वैशाली सामंतच्या “सज धज के में” या जुन्या परंतु सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. तिच्या हटके डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून युजर्स त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @little_munchkin28 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Adrija Paliwal (@little_munchkin28)

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “बाळ गोड आहे खूपच.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप सुंदर डान्स.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “आजकालचे पुरूष खूपच कूल आहेत” दरम्यान, यापूर्वीदेखील या गाण्यावर अनेक युजर्सनी डान्स केला होता; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.