viral video father celebrates children’s success : मुलांचे संगोपन करण्यात, त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यामध्ये पालकांचे आयुष्य निघून जाते. पण, पालकांमध्ये काही गुण असतात जे पुढे जाऊन त्यांच्याच मुलाला जीवनात यशस्वी होण्यास मदत करतात. मग ते प्रामाणिक राहणं असो किंवा कष्ट करणं असतो. त्यामुळे मेहनत करून जेव्हा मुलं यशस्वी होतं. तेव्हा पालकांना जग जिंकल्यासारखी भावना मनात येते. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये मुलं परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाल्यावर बाबांनी चक्क व्लॉग शेअर केला आहे.

रोजंदारीवर काम करणाऱ्या तुळसी मांझी १,००० हून अधिक फॉलोअर्सबरोबर व्लॉग्सच्या माध्यमातून कोणत्याही फिल्टरशिवाय गोष्टी शेअर करत असतात. या व्हिडीओत सुद्धा अशीच एक फिल्टर नसलेली गोष्ट त्यांनी सांगितली आहे. काही दिवसांपूर्वी खास छठ पूजेच्या दिवशी तुळसी मांझी यांची मुलगी मुस्कान कुमारी आणि मुलगा सोनू कुमार दोघेही परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. याचनिमित्त त्यांनी संपूर्ण गावात मिठाई वाटण्याचे ठरवले आहे. जेणेकरून आनंद फक्त घरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण गावात साजरा होईल असे सांगत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

“यापेक्षा मोठा क्षण दुसरा असू शकत नाही” (Viral Video)

बाबांच्या या हसऱ्या चेहऱ्यांमागे ओळखीची पण क्वचितच समोर येणारी एक कहाणी दडलेली आहे. वर्षानुवर्षे केलेली कष्टाची कामं, बांधकाम साइटवरचे रात्रंदिवस काम आणि पैशांचा सतत सांभाळ करत केलेला संघर्ष यांनी या वडिलांचा प्रवास घडवला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शिक्षण घेणे हे अनेकदा दूरचं स्वप्न वाटू लागत. पण, त्यांनी आपल्या मुलांसाठी शिक्षण हेच ध्येय ठेवलं आणि आज त्यांच्या मुलांनी ते मोठ्या जिद्दीने प्रथम श्रेणीत पास होऊन ते पूर्ण केलं आहे. लेकरांच्या यशाचा आनंद डोळ्यांत मावेनासा झालेला एक अभिमानी बाबाचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @tulsi_manjhi_01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आनंद काय असतो हे एका वडिलांना विचारा. या व्हिडीओने मन जिंकून घेतलं”, “एका वडिलांसाठी यापेक्षा मोठा क्षण दुसरा असू शकत नाही”, “एका व्यक्तीचं जिंकणं संपूर्ण कुटुंबाला आनंद देऊन जाते”, “जर वडिलांनी मेहनत करून आपल्याला वाढवलं असेल. तर त्यांना कधीच नाराज होऊ देऊ नये. मुलांचं कर्तव्य आहे की, त्यांनी त्यांच्या वडिलांचा आदर करावा आणि त्यांना आनंदी ठेवावं” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.