Viral Video: समाजमाध्यमांमुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्या नजरेस पडतात, ज्यात अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांशी भांडताना दिसतात किंवा एकमेकांसोबत खेळताना दिसतात. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण चकित व्हाल.
जगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागविण्यासाठी संघर्ष करीत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतो. त्याचप्रमाणे हिंस्र प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांना ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो, तोही आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असतं. त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांतानं शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते; तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात सिंह म्हशीच्या कळपावर हल्ला करताना दिसत आहे.
माणसांच्या आयुष्यात जसा जगण्यासाठी संघर्ष सुरू असतो, तसाच संघर्ष प्राण्यांच्या आयुष्यातही पाहायला मिळतो. जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. यासाठी ते वापरत असलेले डावपेच आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये शिकारीच्या शोधात असलेल्या सिंहाची नजर म्हशीच्या कळपावर जाते. यावेळी सिंह थेट म्हशीच्या कळपावर झडप घालतो आणि त्यातील एका म्हशीला पकडून तिच्या शरीराचे लचके तोडायला सुरूवात करतो. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ यूट्यूबवरील @WildlifeFightClub या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या असून अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर युजर्सदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “शेवटी जंगलाचा राजा तो राजा”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “बापरे खूपच थरारक व्हिडीओ आहे”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “एका म्हशीला स्वतःच्या बळावर खाली पाडताना मी सिंहाला कधीच पाहिले नाही, पण हा मात्र वेगळाच आहे.”
