Viral Video : असं म्हणतात पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. त्याची जागा आयुष्यात कुणीही घेऊ शकत नाही. पहिलं प्रेम हे कधीच न विसरण्यासारखं असतं. सोशल मीडियावर प्रेमावर भाष्य करणारे किंवा प्रेमाविषयी व्यक्त होताना अनेक जण दिसतं. कविता, चारोळ्यांद्वारे अनेक जण प्रेमाविषयी बोलताना दिसतं. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण प्रेमावर कविता सादर करताना दिसतो. त्याची कविता ऐकून तुम्हीही भावुक व्हाल. काही लोकांना त्यांचे पहिले प्रेम आठवेन तर काही लोकांच्या डोळ्यासमोर त्यांच्या प्रियकर किंवा प्रेयसीचा चेहरा येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

तरुणाने सादर केली प्रेमावरची कविता

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. हा तरुण समोर स्टेजवर उभा राहुन प्रेमाविषयी कविता सादर करताना दिसतो. तो कविता सादर करताना म्हणतो,
“एकदा प्रेमात पडल्यावर पुन्हा पडता येत नाही
दुसऱ्या प्रेमात कधी मातीचा सुगंध येत नाही
पहिलं प्रेम हे नेहमी पहिलं असतं
फुलली लाख फुले, गंधाळले कुणीच नाही
एक त्या गुलाबानंतर मला भावले कुणीच नाही
हात मिठीत घेण्यासाठी आले लाख परंतु
एक त्या मिठीसारखे ऊबदार भासले कुणीच नाही”
त्याच्या प्रत्येक वाक्यावर इतर लोक जोरजोराने टाळ्या वाजवताना दिसतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Loveyapa audience reviews in marathi
Loveyapa Movie Review : विषयात गंमत खरी…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Young Man Breaks Down in Tears Over Girlfriend's Photo in New Car
Video : देवाघरी गेलेल्या प्रेयसीचा फोटो नवीन कारमध्ये ठेवला अन् ओक्साबोक्शी रडला, तरुणाचा व्हिडीओ पाहून व्हाल भावुक
SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
Grandfather sings song vasant sena for grandmother romantic video viral on social Media
VIDEO: प्रेम असावे तर असे! डोळ्यात अशी माझ्या ठसली मला वसंत शैना दिसली; आजोबांचा रोमँटिक अदांज, आजीसाठी गायलं भन्नाट गाणं
nana patekar wife neelkanti makes her acting comeback in vicky kaushal chhaava movie
Video : ‘छावा’मध्ये झळकणार नाना पाटेकरांच्या पत्नी! नव्या गाण्यात दिसली पहिली झलक, नीलकांती पाटेकर कोणती भूमिका साकारणार?
video of true two school friend met after 5 years
VIDEO : तब्बल पाच वर्षानंतर जिवलग मैत्रीणी भेटल्या अन् मिठी मारून ओक्साबोक्शी रडल्या; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक

हेही वाचा : “आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, ‘आ आंटे अमलापुरम’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : India Post Payments Bank धारकांनो सावधान! अन्यथा तुमचेही अकाउंट होईल रिकामी; टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

ganeshghumare_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “…तिला कळावे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मित्रा जुन्या आठवणी ताज्या झाल्या” तर एका युजरने लिहिलेय, “वाह दादा म्हणून बरबाद झालो आपण” आणखी एका युजरने लिहिलेय, “पहिल्या पावसाच्या सुगंधाचं काहीतरी वेगळंच असतं. पण असं नाही की दुसरा पाऊस तितकाच छान असणार नाही. आपण जुन्या पावसाच्या आठवणींमध्ये अडकून बसतो, त्याची तुलना नव्या पावसाशी करतो, आणि त्यामुळे नव्या पावसाचा आनंद घ्यायचं विसरतो.
जर जुना पाऊस इतकाच परिपूर्ण आणि चांगला असता, तर तो कायम तुमच्यावर बरसत राहिला असता. तो तुम्हाला उन्हात टाकून गेला नसता. म्हणून जे काही आपल्याला नव्याने मिळालं आहे, त्याचा आदर करा, त्याचा सुगंध अनुभवून घ्या.
मागील पावसात झालेले गाळ आठवून, या नव्या पावसाच्या सौंदर्याची किंमत गमावू नका. कारण, आयुष्य पुढे जाण्यासाठीच आहे, मागे बघत राहून चालत नाही.” अनेक युजर्सनी त्यांचे प्रेमाविषयीचे मत व्यक्त केले आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader