scorecardresearch

Video: तापलेल्या तेलात तळायला टाकलेली मच्छी जिवंत झाली; शेफच्या हातावर तेल उडवलं, अन् शेवटी…

Viral Video: तुम्ही पण छान कोकमाचं आगळ, रवा, मीठ मसाला लावून फ्राईंग पॅनमध्ये तापलेल्या तेलात मच्छी तळण्यासाठी सोडता आणि ती जिवंत झाली तर?

Video: तापलेल्या तेलात तळायला टाकलेली मच्छी जिवंत झाली; शेफच्या हातावर तेल उडवलं, अन् शेवटी…
Video: तापलेल्या तेलात तळायला टाकलेली मच्छी जिवंत झाली; शेफच्या हातावर तेल उडवलं (फोटो: ट्विटर)

Viral Video: सोशल मीडिया हा नवनवीन व्हिडीओजचा खजिना आहे जो आपल्याला आयुष्यात विचारही केला नसेल असे क्षण दाखवत असतो. आपल्याकडे अनेक घरात रविवार म्हणजे मच्छीचा वार मानला जातो. विशेषतः कोकणी माणसाचं घर म्हंटलं की मस्त रवा लावून तळलेली सुरमई, पापलेट.. काहीच नाही तर निदान मांदेलीचे तुकडे हा बेत असतोच असतो. विचार करा की तुम्ही पण छान कोकमाचं आगळ, रवा, मीठ मसाला लावून फ्राईंग पॅनमध्ये तापलेल्या तेलात मच्छी तळण्यासाठी सोडता आणि ती जिवंत झाली तर? विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ बघून तुम्हीही चक्रावाल.

या व्हिडीओत आपण पाहू शकता जसा एक माणूस मच्छी तळण्यासाठी पॅन मध्ये टाकतो तशी ती मच्छी चक्क उड्या मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला लागते. तिच्या उड्यांमुळे कढईतलं तेल सुद्धा माणसाच्या अंगावर उडू लागतं. अशावेळी अर्थात तो माणूसही आधी निरुत्तर होतो. काय करावं हे त्यालाही सुचत नाही शेवटी तो एका हाताने गॅस बंद करून तसाच तो पॅन उचलतो आणि किचनच्या दुसऱ्या बाजूला घेऊन येतो. अवघ्या काही सेकंदाचा हा थरार सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पॅन मध्ये मच्छी तळायला टाकली अन्..

हे ही वाचा << Video:आनंद महिंद्रांना सापडली जगातील सर्वात स्वस्त ट्रेडमिल; म्हणतात ‘हा’ जुगाड यंदाचा सर्वात..

खरंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून यावर अनेकांच्या शॉकिंग प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. आपणही सगळे जाणतो की पाण्यातून बाहेर काढल्यावरही काही क्षण मासोळी जिवंत असते, तिची तडफड सुरु असते. पण पाण्यातून बाहेर पडून, घरी आणून, मसाले लावून तळायला टाकेपर्यंत ही मच्छी तग धरून राहिलीच कशी? आणि मुळात जेव्हा इतर सर्व प्रक्रिया केली तेव्हा तिने काहीच प्रतिसाद दिला नसेल का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हालाच माहित असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 09:29 IST

संबंधित बातम्या