scorecardresearch

VIRAL VIDEO : चमकदार डोळे असलेला हा रहस्यमय सागरी प्राणी बोटीवर बसलेल्या मच्छिमाराचा पाठलाग करत होता आणि….

रात्री समुद्रातून प्रवास करणे हा अनेक प्रकारे एक रोमांचक आणि सुखद अनुभव आहे. परंतु काहीवेळा ते धोकादायक देखील ठरू शकतं. असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Mysterious-Sea-Creature
(Photo : Twitter/ Pedrohenriquetunes)

रात्री समुद्रातून प्रवास करणे हा अनेक प्रकारे एक रोमांचक आणि सुखद अनुभव आहे. परंतु काहीवेळा ते धोकादायक देखील ठरू शकतं. अलीकडेच, दक्षिण ब्राझीलच्या किनार्‍यावर समुद्रात जाण्यासाठी निघालेल्या एका मच्छिमाराला एक भयानक क्षणाला सामोरे जावे लागले. एक चमकदार डोळे असलेला हा सागरी प्राणी या मच्छीमाराच्या मागे आला आणि पूढे घडलं ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मच्छिमाराची शिकार करण्यासाठी हा प्राणी वेगवान बोटीच्या मागे वारंवार पाण्यातून उडी मारत होता. काही वेळाने पाठलाग करत असताना तो प्राणी मच्छिमाराच्या अगदी जवळ आला. मात्र, पुढे काय झालं हे पाहण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

या रहस्यमय प्राण्याचा पाठलाग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ४७ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये रहस्यमय प्राणी वारंवार पाण्यातून उडी मारताना आणि नंतर खाली जाताना दिसून येत आहे. फक्त त्याचे दोन डोळे अंधारात चमकताना दिसून येत होते. काही वेळासाठी हा प्राणी आता मच्छीमाराची शिकार करणार की काय असं वाटू लागतं. मच्छीमार सुद्धा तितक्याच हुशारीने या प्राण्यापासून स्वतःचा बचाब करताना दिसून येत आहे.

आणखी वाचा : हे काय? रॅम्पवॉक करताना मॉडेल अचानक प्रेक्षकाला मारू लागली, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!

सुदैवाने मच्छीमार बचावण्यात यशस्वी झाला आणि प्राणी पाण्यात पडला. त्यानंतर मच्छीमाराने हा प्राणी पकडला. पण तो कोणता प्राणी आहे हे आजतागायत कळू शकले नाही. या व्हिडीओसोबत पोर्तुगीज भाषेत कॅप्शन लिहिली आहे. “एक रहस्यमय प्राणी काल रिओ ग्रांडे डो सुल येथे एका बोटीचा पाठलाग करत होता.” असं या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं होतं.

आणखी वाचा : टांझानियातील ‘त्या तरूणाची गोविंदा स्टाईलमध्ये डायलॉगबाजी, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अरारारा खतरनाक ड्रायव्हिंग! पठ्ठ्याने तर कमालच केली; VIRAL VIDEO पाहून भलेभले पडले गार

२७ जानेवारी रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ३७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर १,९०० हून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. डेली स्टारने असंही वृत्त दिले आहे की, ही घटना ब्राझीलच्या दक्षिणेकडील राज्य रिओ ग्रांडे डो सुलच्या किनारपट्टीवर घडली आहे. हा प्राणी डॉल्फिन असावा, अशी शंका अनेकांना सुरुवातीला आली.

चमकणार्‍या डोळ्यांबद्दल एका युजरने सांगितलं की, ही चकाकी टेपेटम ल्युसिडम नावाच्या संरचनेतून येते, जी निशाचर प्राण्यांच्या डोळ्यातील पडद्यामध्ये असते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video fisherman chased by mysterious sea creature off brazil coast clip goes viral watch prp

ताज्या बातम्या