scorecardresearch

Viral Video: फिटनेसवालं लग्न! वधू-वरांनी स्टेजवरच पुश-अप्स करायला केली सुरुवात

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधू आणि वर लग्नाच्या मंचावर पुशअप करताना दिसत आहेत.

Fitness wedding
व्हायरल व्हिडीओ (फोटो: bridal_lehenga_designn / Insatgram)

लग्नाचा दिवस कोणत्याही वधू किंवा वरसाठी खूप खास असतो. लोक त्यांचे लग्न संस्मरणीय बनवण्यासाठी काय करतात? याचा अंदाज नुकताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लावता येतो. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये वधू आणि वर लग्नाच्या मंचावर पुशअप करताना दिसत आहेत.

विवाहसोहळ्याशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर आणि लाईक केले जातात. असाच एक वधू-वराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की तो पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. व्हिडीओमध्ये वधू आणि वर एक मजेदार चॅलेंज घेताना दिसत आहेत. या चॅलेंजमध्ये वधू आपल्या वराला टक्कर देताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वधू वराला लग्नाच्या मंचावर पुश अप्स चॅलेंज करताना दिसत आहे.

(हे ही वाचा: डेव्हॉन कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये पारंपारिक कपडे घालून थिरकली CSK ची टीम; व्हिडीओ होतोय viral)

(हे ही वाचा: अवघ्या ५०रुपयांत ‘हे’ वृद्ध जोडपं खाऊ घालतंय पोटभर जेवण; Viral Video बघून नेटकरी झालेत फॅन)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कोण जिंकेल माहित नाही, पण हा व्हिडीओ सर्वांचीच मनं जिंकत आहे. हा व्हिडीओ bridal_lehenga_designn नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आला आहे. तुम्ही क्वचितच कोणी वधू-वर लग्नाच्या मंचावर पुशअप्स करताना पाहिले असेल. त्यामुळेच या ‘फिटनेस लव्हर’ जोडप्याचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video fitness wedding bride groom does pushups on stage ttg

ताज्या बातम्या