Viral Video: भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. या भाषांमधील गाणीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अल्बम साँग असो किंवा चित्रपटातील गाणी असो, ही एकदा चर्चेत आली की सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक परदेशी कलाकार एका भारतीय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

हल्ली सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका परदेशी तरुणीचा मराठी गाण्यावरील डान्स व्हायरल होत आहे.

समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर ‘लाल लाल कलरची बांगडी’, हे गाणं खूप चर्चेत आहे. आता या गाण्यावर एक तरुणी खूप छान डान्स करताना दिसत आहे.

‘नऊवारी साडी’, ‘गुलाबी साडी’ या गाण्यांमुळे चर्चेत आलेला गायक संजू राठोड सतत त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे पुन्हा पुन्हा चर्चेत येतो. त्याचं नवीन गाणं आलं रे आलं की, सोशल मीडियावर रिल्स बनवणाऱ्यांची रांग लागते. ‘काली बिंदी’ आणि ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यांच्या घवघवशीत यशानंतर संजूचं ‘लाल लाल कलरची बांगडी’हे गाणं चर्चेत आलंय. आता या गाण्याची भुरळ सामान्य जनतेपासून मराठी कलाविश्वते अगदी बॉलीवूडपर्यंत प्रत्येकाला पडली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला हिरव्या रंगाची साडी नेसून हातात लाल रंगाच्या बांगड्या घालून ‘लाल लाल कलरची बांगडी’, या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Jennifer (@jennijigermany)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jennijigermany या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “साडी, बांगड्या अन् तुझा डान्स… सगळंच भारी” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप छान डान्स” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “आईशप्पथ! खूप मस्त डान्स” आणखी एकाने लिहिलेय,, “खरंच जबरदस्त डान्स केला हिने”