Viral Video: भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. या भाषांमधील गाणीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अल्बम साँग असो किंवा चित्रपटातील गाणी असो, ही एकदा चर्चेत आली की सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल एका भारतीय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
भारतातील विविध भाषांतील गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. या गाण्यावर अनेक जण रील्सदेखील बनवतात. नेहमीच भारतीय गाण्यांवर रील्स बनविणारा सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलने आता एका सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या हिंदी गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा डान्स पाहून नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेलं ‘हमने वही लगाया दिल’ गाण्यावर अनेक युजर्स रिल्स बनवताना दिसत आहेत. या गाण्यावर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वचजण रिल्स बनवत आहेत. आता याच गाण्याची भुरळ किली पॉलला देखील पडल्याची दिसत आहे. या गाण्यावर तो जबरदस्त डान्स करीत आहे. यावेळी तो गाण्यातील प्रत्येक स्टेप सुंदर करत असून त्याचा हा व्हिडीओ पाहून अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नेहमीप्रमाणे किली पॉल त्याच्या पारंपरिक वेशात असून तो ‘हमने वही लगाया दिल’गाण्यावर डान्स करीत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव लक्षवेधी असून त्याच्या डान्सची स्टेपदेखील लक्ष वेधून घेत आहे. त्याचा या व्हिडीओवरील डान्स पाहून युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.
इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉलचे इन्टाग्रामवर दहा दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत सहा लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “भाऊ खूप सुंदर नाचलास”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “तुमचा डान्स मला आवडला”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “खूपच सुंदर डान्स किली” तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “किली पॉल तू खरंच ग्रेट आहेस”, तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.
