Anniversary Celebration Viral Video : आयुष्यात मित्र असायला हवेत. मित्र ,सखा, यार, बेस्ट फ्रेंड, खास मित्र अशी मैत्रीची खूप सुंदर नावे आहेत. फक्त चहा प्यायलाच नाही अगदी दळण आणायला जाताना सुद्धा जर तुमचा मित्र, मैत्रीण बरोबर येत असेल तर त्याहून मैत्रीचे सुंदर उदाहरण काय असू शकतं. त्यामुळे म्हणतात ना आयुष्यात तुमच्या शत्रूला तुमचा मित्र बनण्यासाठी हजार वेळा संध दिलीत तरी चालेल. पण, तुमच्या मित्राला तुमचा शत्रू बनण्याची संधी कधीही देऊ नये. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस असतो. लग्नाला यायला जमलं नसल्यामुळे मित्रांनी लग्नाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. फक्त केक नाही तर अगदी पुन्हा लग्न लावून दिले. चाळीमध्ये सगळे शेजारी आणि मित्र-मैत्रिणी मिळून अंतरपाट पकडून उभे होते. मंगलाष्टका म्हंटल्यानंतर सगळ्यांनी अक्षता टाकून जोडप्याला एकमेकांना हार घालायला सांगितले. एवढेच नाही तर जोडप्याने मिळून केक सुद्धा कापला आणि अनोख्या पद्धतीने हा लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
लक्षात राहील असा लग्नाचा वाढदिवस (Viral Video)
मित्रांमुळे छोट्यातली छोटी गोष्ट देखील अगदी मोठ्या सणांसारखी वाटते. लग्नाला यायला जमलं नाही म्हणून लग्नाचा तो खास क्षण जोडप्याला आणि मित्रांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. पुन्हा एकदा लग्न लावून त्यांनी हा क्षण अविस्मरणीय बनवला. लग्न लावल्यानंतर सगळे अगदी आनंदाने, उत्साहाने नाचतानाही दिसले. त्यामुळे या सगळ्यांचे क्रेडिट सुद्धा जोडप्याच्या मित्रांनाचा जाईल. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी कशाप्रकारे जोडप्याचं पुन्हा एकदा लग्न लावून दिले व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ravina_sk93 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असं झालं पाहिजे की, पुढच्या प्रत्येक वर्षी आठवण राहिला पाहिजे. जेव्हा मनापासून सगळे सहभागी होतात तेव्हा अविस्मरणीय आठवणी तयार होतात” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “खूप छान आणि सुंदर”, “कडक” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
