Viral Video: प्राणीदेखील माणसांप्रमाणेच विविध गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आपण जसे खेळतो, तसेच प्राणीदेखील एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे असे गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल होतात. मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता; ज्यात एक हत्तीचे पिल्लू एकांतात एका तलावामध्ये पोहण्याचा आनंद घेत होते. तसेच एकदा एक मांजर चेंडूसोबत खेळताना दिसली होती. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात श्वानाची पाच पिल्ले वेगळाच खेळ खेळताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर सतत अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील यावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. या व्हिडीओंमध्ये कधी काही हिंस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर कधी प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्युज मिळवतात. अशातच आता पाच श्वानांचा एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे. त्यामध्ये हे पाच श्वान सर्व खेळ खेळताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दुकानाबाहेर कपडा लटकवलेला दिसत आहे. त्यावेळी तिथे श्वानाची पाच पिल्ले येतात आणि तिथल्या एका शिडीवर चढून त्या कपड्याला लटकतात. सुरुवातीला एक पिल्लू ही कृती करते. त्यानंतर एकामागोमाग एक असे पाचही जण त्या कपड्याला लटकतात आणि गोल फिरतात. श्वानाच्या पिल्लां चा हा अनोखा खेळ पाहून कोणालाही हसू येईल. त्यांचा हा मजेशीर व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @malinois_universe या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या शेअरकर्त्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, ‘श्वानाच्या पिल्लांमध्ये असलेली ताकद अविश्वसनीय आहे’, असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत दशलक्षांमध्ये व्ह्युज आणि साडेपाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

हेही वाचा: ‘गुलाबी साडी’ गाण्यावर भरलग्नात नवरदेवाच्या मित्रांनी केला डान्स; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “मित्र असावे तर असे”

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “हे पूर्णपणे टीम वर्क आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “हा जगातील सर्वात अविश्वसनीय प्राणी आहे.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “व्वा खूप सुंदर खेळ आहे यांचा.” तर आणखी एकाने लिहिलेय, “खूप सुंदर व्हिडीओ.”

दरम्यान, यापूर्वीदेखील काही श्वानांचे अनेक गमतीशीर व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते; ज्यात एक श्वान त्याच्या मालकिणीला चकवा देऊन पावसात भिजण्यासाठी जातो. तर, आणखी एका व्हिडीओमध्ये एक श्वान चिकन पाहून डान्स करताना दिसला होता. तसेच आणखी एका व्हिडीओमध्ये एक श्वान चक्क कॅट वॉक करताना दिसला होता.