tumhi ho bandhu dance video viral : शाहिद कपूर, क्रिती सेनन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘कॉकटेल 2’ या रोमँटिक कॉमेडी-ड्रामा चित्रपटातील गाणी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या गाण्यांवर अनेक रील्स तयार केले जात असून प्रेक्षकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ दिसत आहे. मूळ ‘कॉकटेल’ चित्रपटातील ‘तुम्ही हो बंधू’ हे गाणे आजही चाहत्यांमध्ये नॉस्टॅल्जिया निर्माण करते. त्याचबरोबर , ‘कॉकटेल 2’ मधील ‘बंधू 2.0’ या गाण्याच्या डान्स स्टेप्सनी लोकांना रील बनवण्यासाठी आकर्षित केले आहे. सध्या याच गाण्यावर आधारित एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काही तरुणींनी त्यांच्या खास मैत्रिणीच्या लग्नात ‘बंधू 2.0’ या गाण्यावर जबरदस्त डान्स सादर केला आहे. हा परफॉर्मन्स त्यांनी त्यांच्या नवरी मैत्रिणीला समर्पित केला आहे. या गाण्यात क्रिती सेनन आणि रश्मिका मंदाना यांनी ज्या स्टेप्स केल्या आहेत, अगदी तशाच स्टेप्स या मैत्रिणींनीही केल्या आहेत. “तुम्ही हो बंधू सखा तुम्ही” या ओळीवर नवरी मुलगीही आपल्या मैत्रिणींमध्ये सामील होते आणि सगळ्या जणी तिच्या भोवती गोल फिरत आनंदाने डान्स करतात. हा व्हिडीओ शेवटपर्यंत खूपच भावनिक आणि आनंददायी वाटतो.
लग्नसमारंभात डान्स करण्याची क्रेझ सध्या खूप वाढली आहे. प्रत्येक जण आपला डान्स आणि गाणं वेगळं आणि खास कसं ठरेल याकडे लक्ष देतो. नवरी मुलीसाठी हा क्षण अविस्मरणीय व्हावा, यासाठी मित्र-मैत्रिणी खास तयारी करून परफॉर्मन्स देतात. अशाच प्रकारे या नवरीच्या मैत्रिणींनीही ट्रेंड लक्षात घेऊन ‘बंधू 2.0’ या गाण्यावरसुंदर आणि उत्साहपूर्ण डान्स सादर केला आहे. त्यांचा हा परफॉर्मन्स नवरी मुलीसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला आहे. व्हायरल व्हिडीओ तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा..
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @beatpefeet_• या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी डान्स पाहून ग्रुपचे कौतुक करताना दिसून आले आहेत आणि “या रीलमध्ये सिनेमापेक्षा जास्त स्टोरी आहे”, “खूप मस्त”, “जबरदस्त” तर काही जण इमोजीसह त्यांच्या भावना कमेंटमध्ये मांडताना दिसून आले आहेत…
