Little Girl Dance Video Viral : डान्स ही फक्त कला नसून मनातील आनंद, उत्साह आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग आहे. गाण्याच्या प्रत्येक बीटवर शरीर लयबद्ध होतं आणि वातावरणात एक वेगळीच जादू निर्माण होते. पावसात नाचण्याचा आनंद तर आणखीनच खास आणि अविस्मरणीय असतो. यामुळे प्रत्येक जण पाऊस पडला की, अगदी बेधुंद होऊन नाचताना दिसतो. अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होताना दिसतो आहे; यामध्ये चिमुकलीचा उत्साह पाहून तुम्हीही थिरकायला लागला.

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘बागी’ चित्रपटातील “मैं नाचूँ आज, छम छम छम” हे गाणं अनेक तरुण-तरुणींचं आवडतं गाणं आहे. या गाण्यातील टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्या पावसातील दमदार स्टेप्समुळे त्याची क्रेझ आजही कायम आहे. पाऊस पडला की, अनेक जण या गाण्यावर नाचताना दिसतात. व्हायरल व्हिडीओतील चिमुकली सुद्धा पावसात या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसली आहे. गाण्याच्या प्रत्येक ओळीवर तिने धरलेला ठेका, तिच्या स्टेप्स, तिचे हावभाव अगदी बघण्याजोगे आहेत.

पावसात नाचण्याचा आनंद सर्वात खास असतो (Viral Video)

पावसात एखादा तरी भिजत डान्स करावा अशी सगळ्या मुलींची इच्छा असते. तर हीच इच्छा “सबसे होक बेफिक्र, नाचूं मैं आज, छम छम छम” या गाण्याच्या ओळींवर श्रद्धा कपूरसारख्या हुबेहूब डान्स करून चिमुकली पूर्ण करताना दिसते आहे. पावसात नाचताना तिचा उत्साह पाहून आजूबाजूची मंडळीही एकटक बघताना दिसत आहेत. त्यामुळे तिला नाचताना पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. पावसात नाचणाऱ्या चिमुकलीचा व्हायरल डान्स व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ms_guru_harshikha2 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “ज्या क्षणाचा अनुभव मला घ्यायचा होता, तो क्षण ती जगते आहे”, “ती प्रत्येक मुलीचं स्वप्न पूर्ण करते आहे”, “माझ्या लहानपणातील अशाच काही गोष्टी मला खूप जास्त आठवतात”, “लहानपणी पावसात नाचण्याचा आनंद सर्वात खास असतो”, “छोटी श्रद्धा” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…