Viral Video: हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्यातील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच एका तरूणीचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
अनेक गरीब घरांमध्ये खरे कलाकार जन्माला येतात असं म्हटलं जातं. पैसा, ओळख नसली तरी हे कलाकार आपल्या कलेच्या जोरावर प्रसिद्धी मिळवतात. हल्ली सोशल मीडियामुळे अशा कलाकारांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळू लागली आहे. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरूणीदेखील अगदी सामान्य कुटुंबातील दिसत असून यावेळी ती भर बाजारात सुंदर डान्स करताना दिसतेय.
खरंतर, सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात.
सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील ‘चुनरी चुनरी’ या गाण्यावर डान्स करत आहे, ज्याच्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बाजारामध्ये एका तरूणीच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ती तरूणी ‘चुनरी चुनरी’ या गाण्यावर खूप सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी ती तरुणी करत असलेल्या भन्नाट डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरीही तिचं कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wangmos_lifestyle_ या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन्सहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “ताई खूपच सुंदर डान्स केलाच”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “खरे कलाकार असेच घडतात”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “किती सुंदर नाचलीस गं”
