Viral Video: लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे, सध्या सुंदर डान्स करणाऱ्या चिमुकलीचा एक डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी तिच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील चिमुकली ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

आपल्या देशातील अनेक प्रकारची पारंपरिक नृत्ये प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तरी जिल्हा किंवा विभागानुसार वेगवेगळी परंपरा पाहायला मिळते. प्रत्येक जिल्हा किंवा विभागातील जेवण, भाषा आणि नृत्यकला यांमध्ये वेगळेपण दिसून येते. महाराष्ट्रात खानदेश हा असा एक प्रदेश आहे की, तेथील खानदेशी जेवण आणि खानदेशी नृत्य विशेष प्रसिद्ध आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चिमुकली ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी कशी कुदी रायनी कशी डोली रायनी’ या खानदेशी गाण्यावर डान्स करत आहे.

डान्स, संगीत, अभिनय यांसारख्या कला क्षेत्रात आपलं नाव मोठं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सोशल मीडियावर लाखो युजर्स अशा विविध कला सादर करत असतात, ज्यातील काही मोजकेच लोक लोकप्रिय होतात. ह्या कला सादर करणाऱ्यांमध्ये अगदी लहानांपासून वृद्धापर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर जबरदस्त डान्समुळे सतत चर्चेत असलेल्या चिमुकलीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.

स्वत:चं लग्न खास बनवण्यासाठी नवरा आणि नवरी डान्स करताना दिसतात. अशाच एका लग्नाच्या फंक्शनमध्ये नवरी मनापासून नाचताना दिसत आहे. पूर्वी लग्नसराई म्हटलं की शुभ मुहूर्त, मानपान, लग्नातील विधी याकडे अधिक लक्ष दिलं जायचं. परंतु, आताच्या लग्नांमध्ये लग्नातील वधू-वराच्या एन्ट्रीचे डान्स, भन्नाट उखाणे, फोटो, व्हिडीओ याकडे अधिक लक्ष दिलं जातं. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोशल मीडियावरही लग्नातील अनेक हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक चिमुकली नवरीबरोबर तिच्या हळदीत भन्नाट नाचताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नवरी पिवळ्या साडी अन् दागिणे घालून सजली असून एक चिमुकली तिच्याजवळ येते आणि सुंदर अभिनयासह नाचायला सुरूवात करते. यावेळी ती चिमुकली ‘देख तुनी बायको कशी नाची रायनी कशी कुदी रायनी कशी डोली रायनी’ या खानदेशी गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करते. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Jiya More MJM (@jiyamore.mjm)

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jiyamore.mjm या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘पोरी तू एकदम भारीच नाचलीस…’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘नवरी पण खरंच खूप उत्साही आहे’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘व्वा राडाच केला हिने’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘लयभारी नाचलीस.’