Dance Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सोशल मीडिया हे कला सादर करण्याचं एक माध्यम झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तुम्ही डान्सचे अनेक व्हिडीओ पाहिलेच असाल. अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण आपली कला सादर करत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असतात.

सध्या असाच एक डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात एका तरुणीने माधुरी दीक्षितच्या हिट गाण्यावर डान्स परफॉरमन्स केला आहे. तिचा डान्स पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणीचा डान्स पाहून तुम्हीदेखील नक्कीच कौतुक कराल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणीने १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या सैलाब या सिनेमातील सुपरहिट गाण्यावर डान्स केला आहे. माधुरी दीक्षितच्या ‘हमको आज कल है’ या गाण्यावर तरुणीने तडफदार डान्स करून सगळ्यांची मन जिंकून घेतली आहेत.

या डान्ससाठी तरुणीने अगदी अभिनेत्रीसारखा श्रृंगार केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. हातात हिरव्या बांगड्या, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर आणि नऊवारी साडी असा तरुणीचा मराठमोळा अंदाज या व्हिडीओत दिसून येतोय. अभिनेत्रीसारख्या अगदी हुबेहुब डान्स स्टेप करत या तरुणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तरुणीचा डान्स पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे आणि भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला तरुणीचा हा व्हिडीओ @selonyyyy.__ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला ७०९k व्ह्युज आले आहेत. दरम्यान, या तरुणीने अकाउंटवर अनेक डान्सचे व्हिडीओ तिच्या अकाउंटवर शेअर केल्याचं दिसून येतंय.

युजर्सच्या प्रतिक्रिया

तरुणींच्या डान्सचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हीचा लूक जबरदस्त आहे.. माधुरीची एक झलकच दाखवली हिने.” तर दुसऱ्याने “अतिशय उत्तम परफॉरमन्स” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मस्त एक नंबर”