आज सोशल मीडियामुळे टॅलेंटला ओळख मिळवण्यासाठी मोठ्या स्टेजची गरज उरलेली नाही. मोबाईल कॅमेरा आणि आत्मविश्वास असेल तर कुठूनही एखादा हिरा समोर येऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सध्या सोशल मीडियावर सरकारी शाळेतील एका मुलीचा डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ‘बॉर्डर’ चित्रपटातील भावनिक आणि देशप्रेम जागवणाऱ्या ‘संदेसे आते हैं’ या गाण्यावर या मुलीने असा काही जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे की नेटकरी थक्क झाले आहेत. साधी शाळा, साधं वातावरण, पण टॅलेंट मात्र कमाल.
हा व्हिडीओ एका सरकारी शाळेतला आहे. शाळेच्या वर्गातच हा डान्स शूट केलेला आहे. ‘बॉर्डर’ चित्रपटातील सगळ्यांच्या ओळखीचं ‘संदेसे आते हैं’ हे गाणं लावून त्या मुलीने छान डान्स केला आहे. डान्समध्ये देशप्रेम, भावना आणि आत्मविश्वास सगळं काही दिसून येतं. ना मोठा स्टेज, ना झगमगाट, ना लाईट्स तरीसुद्धा हा व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या मनाला थेट भिडतोय.
व्हिडीओची सुरुवात एका साध्या सरकारी शाळेच्या वर्गातून होते. वर्गात बाकीची मुलं गोळा झालेली दिसतात आणि सगळ्यांचं लक्ष त्या एका मुलीकडे असतं. गाणं लागताच ती मुलगी डान्स करायला सुरुवात करते. तिच्या हालचालीत आत्मविश्वास असतो, पावलं आणि हातवारे गाण्याशी छान जुळलेले दिसतात. चेहऱ्यावरचे भाव इतके छान आहेत की गाण्याची भावना थेट मनाला भिडते. हा डान्स पाहिल्यावर एकच गोष्ट लक्षात येते, टॅलेंटला कुठलीही सीमा नसते.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर anuuu1811 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला दोन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले असून सहा हजारांपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. प्रतिक्रियांमध्ये लोक भरभरून कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलं आहे, “तारीफ के काबिल आहे ही मुलगी”, तर दुसऱ्याने म्हटलंय, “सरकारी शाळेतील टॅलेंट पाहून अभिमान वाटतो.”
काहींनी गाण्याचं कौतुक करत, “हे गाणं आजही तितकंच मनाला भिडतं” असं म्हटलं आहे, तर अनेकांनी या डान्सला “बेस्ट परफॉर्मन्स” असं संबोधलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ फक्त डान्सचा नाही, तर तो आत्मविश्वासाचा, संधींचा आणि खऱ्या टॅलेंटचा आहे. सरकारी शाळेतील ही मुलगी आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे.
