scorecardresearch

Premium

ताज हॉटेलसमोर ‘Bamb Aagya’ गाण्यावर तरूणीने केला डान्स, VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले…

हल्लीची तरूण मुलं-मुली कधी काय करतील, याचा काही नेम नाही. त्यात ज्यांना डान्सची आवड आहे, ते कुठेही गाणं सुरू झालं की नाचायला सुरूवात करतात. मग आपण कुठे आहोत, कोणत्या ठिकाणी कोणत्या गाण्यावर डान्स करतोय, याचा सोशल मीडियाावर काय परिणाम होईल याचा ते विचार करत नाहीत.

Girl-Dance-Video-Viral
(Photo: Instagram/ pandit_girl_242 )

हल्लीची तरूण मुलं-मुली कधी काय करतील, याचा काही नेम नाही. त्यात ज्यांना डान्सची आवड आहे, ते कुठेही गाणं सुरू झालं की नाचायला सुरूवात करतात. मग आपण कुठे आहोत, कोणत्या ठिकाणी कोणत्या गाण्यावर डान्स करतोय, याचा सोशल मीडियाावर काय परिणाम होईल याचा ते विचार करत नाहीत. कारण ते आपल्या डान्समध्ये इतके दंग होऊन जातात की त्यांना कसलेच भान राहत नाही. अशाच एका डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तरूणीने ताज हॉटेलसमोरच चक्क ‘बम्ब आ गया’ या गाण्यावर डान्स केला. हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

सोशल मीडिया आणि इन्स्टाग्रामच्या जमान्यात शॉर्ट व्हिडीओ बनवण्याचा ट्रेंड आला असून त्यात रील्स हे खूपच सामान्य झालं आहे. दररोज लोक फॉलोअर्स मिळवण्याच्या प्रयत्नात इन्स्टाग्राम रील आणि YouTube शॉर्ट्स रेकॉर्ड करताना दिसतात. असाच एक प्रयत्न या तरूणीने केला असून मुंबईतल्या ताज हॉटेलसमोर डान्स रील करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती ताज हॉटेलसमोर ‘बम्ब आ गया’ या पंजाबी गाण्यावर नाचताना दिसत आहे आणि हा व्हिडीओ नेटिझन्सना खूपच आवडू लागलाय. 

Cozy Cardio
‘रोज गाणी ऐकत ४५ मिनिटे घरातच चाला’ असे सांगणारा Cozy Cardio व्यायाम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सर्वकाही
RBI MPC Meet keeps repo rate and GDP growth unchanged
सणासुदीच्या आधी आरबीआयचं गिफ्ट; कर्जाचा हप्ता वाढणार नाही, रेपो दर ६.५० टक्क्यांवर स्थिर
dance video
“नाच रे मोरा, आंब्याच्या वनात..” गाण्यावर आजोबांनी केला भन्नाट डान्स, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
guruji told ukhana to groom in wedding funny video goes viral on social media
VIDEO : नवरदेवाला उखाणा येईना तेव्हा भटजीनेच सांगितलं नाव कसं घ्यायचं; म्हणाले, ” आंब्याचा केला आमरस, लिंबाचं केलं सरबत…”

आणखी वाचा : VIRAL VIDEO: डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत मोबाईल हिसकावला, ट्रेनच्या दरवाज्यावर बसण्याचा शहाणपणा नडला

प्रियांशी पांडे असे या मुलीचे नाव आहे, तिच्या इन्स्टाग्रामवर तब्बल १.७ मिलियन इतके फॉलोअर्स असून ती तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर बरीच सक्रिय असते. तिचा हा व्हिडीओ शेअर करताना फक्त “बम्ब आ गया” असं कॅप्शन दिलं आहे. 

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! अजबच…चक्क बकरीसोबत केलं लग्न, घेतली सोबत जगण्या मरण्याची शपथ!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लेकाला सायकलवर आरामात बसता यावं म्हणून आईने केलेला हा Desi Jugaad एकदा पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. अनेकजण तिच्या डान्सचं कौतूक करताना दिसून येत आहेत. तर काही जणांना ताज हॉटेलसमोर ‘बम्ब आ गया’ गाण्यावर केलेला डान्स आवडला नाही. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर टिका देखील केलीय. पण तिचा डान्स पाहून सारेच जण तिचे चाहते झाले आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.५ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. ‘खूपच सुंदर’, ‘अफलातून’, ‘जबरदस्त डान्स’ अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिसून येत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video girl dances bamb aagya infront taj hotel mumbai netizens super instagram reel prp

First published on: 10-06-2022 at 19:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×