Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एक थरारक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुण मुलगी सिंहाचा पिंजरा साफ करत असताना अचानक मृत्यूच्या दारात उभी ठाकते. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. हे वाचून तुम्हाला असं वाटेल की खरंच किती नशीबवान असेल ती आणि जर ती त्या सिंहाच्या तावडीत सापडली असती तर काय झालं असतं?
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ हे एआयमार्फत बनवलेले असतात, पण त्यातूनही प्रसंगावधान कसे राखावे हे दिसून येते. पण काही व्हिडिओ अवाक् करणारे असतात. सध्या अशाच एका एआय व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. एका प्राणीसंग्रहालयात सिंहाचा पिंजरा साफ करणारी मुलगी आणि अचानक सुटलेला सिंह, असा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाल्याचा एआय व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एआय जनरेटेड आहे. एआय जनरेटेड असला तरी असा प्रसंग घडल्यास यातून मार्ग काढून स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे असंच या व्हिडीओतून दिसत आहे.
सावधपणे काम करत होती मुलगी
व्हिडिओमध्ये दिसते की, एक मुलगी अतिशय शांतपणे सिंहाच्या वाड्याची (Enclosure) साफसफाई करत आहे. तिच्या हातात पाण्याचा पाईप असून ती पूर्णपणे आपल्या कामात मग्न आहे. तिला कल्पनाही नव्हती की पुढच्याच क्षणी काय वाढून ठेवले आहे.
अचानक उघडला पिंजरा आणि…
मुलगी साफसफाई करत असतानाच, अचानक सिंहाच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला जातो. काही कळण्याच्या आतच तो अवाढव्य सिंह मुलीच्या अगदी समोर येऊन उभा राहतो. हा प्रसंग इतका भयानक होता की कोणत्याही क्षणी तो सिंह मुलीवर हल्ला करू शकला असता.
प्रसंगावधान राखले आणि वाचला जीव
समोर साक्षात मृत्यू असतानाही या मुलीने कमालीचे धैर्य दाखवले. तिने घाबरून पळण्याऐवजी हातातील पाण्याचा पाईप थेट सिंहाच्या तोंडावर धरला. पाण्याचा जोराचा मारा पाहून सिंह क्षणभर गोंधळला आणि मागे सरकला. याच संधीचा फायदा घेत मुलगी वेगाने बाहेर पडली आणि तिचे प्राण वाचले.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मुलीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. अनेकांनी म्हटले की, “जर तिने पाण्याचा पाईप वापरला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती.” काही युजर्सनी या घटनेला ‘नशिबाची साथ’ म्हटले आहे, तर काहींनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
