Ganpati Bappa Agman Sohla Viral Video : वर्षभरातील सगळ्यात उत्साहाचा काळ म्हणजे गणपती बाप्पाचे आगमन. सार्वजनिक ठिकाणी, घरोघरी विराजमान होणारा या बाप्पाच्या आगमनाची प्रत्येक भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे डेकोरेशन किंवा बाप्पाच्या स्वागतात कोणतीच कमतरता भासणार नाही यासाठी महिनाभरापासून तयारी करत असतात. कोणी डीजेच्या तालावर, तर कोणी ढोल-ताशा पथक ठेवून तर कधी कोणी लेझीम नृत्य सादर करून बाप्पाचे स्वागत करतात. पण, सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
करी रोडचा कैवारी या बाप्पाच्या स्वागतासाठी मंडळाने खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. काही लहान मुलींनी मंडळाची जर्सी घालून ‘पार्वतीच्या बाळा,पायात वाळा’ आणि ‘आंब्या तूजो ताल-ताल,मोडून रथ सजविला’ अशा गणपती बाप्पाच्या दोन सुंदर गाण्यांवर डान्स करून त्यांचे अगदी थाटामाटात स्वागत केले आहे. सगळ्या मुलींना मंडळातील लोकं भरभरून दाद देतानाही दिसली.
बाप्पाचे स्वागत असेच झाले पाहिजे (Viral Video)
आगमनाच्या मिरवणुकीत डीजेवर बॉलिवूडच्या गाण्यांवर अगदी बेभान होऊन नाचणारे अनेक जण दिसतात. मात्र, संस्कृती जपत बाप्पाच्या गाण्यावर असा सुंदर डान्स करणारी माणसं फार कमीच पाहायला मिळतात. त्यामुळे या व्हिडीओचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @the_vedant_nagwekar_45 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘खूप कमी बघायला मिळत आता असं आगमन. नाहीतर सगळीकडे कॉम्पिटिशन चालू आहे कोणाचा आगमन बेस्ट असेल यावरून’, ‘अप्रतिम अप्रतिम अप्रतिम! बाप्पाचे स्वागत असेच झाले पाहिजे. तर त्यालाही आल्याचा आनंद होतो’, ‘अशा स्वागताने बाप्पा नक्कीच प्रसन्न झाले असतील’, ‘आता पर्यंतचे सगळ्यात भारी आगमन! हीच आपली परंपरा, हीच आपली संस्कृती. खूप खूप खूप छान’, ‘भारी असे काही प्रत्येक मंडळानी कार्यक्रम करायला हवेत, एक नंबर भारी’, ‘खुप छान आगमन केलं बाप्पाचे आपण बोलायला शब्द नाही खुप गोड.’, ‘अतिशय सुंदर बाप्पाचे आगमन! साधेपणात खरं आनंद आहे’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.
