Viral Video: नृत्य (डान्स ) ही कला आहे. ही कला जोपासावी लागते. प्रत्येक व्यक्ती तिला जमेल तसे डान्स करू शकते पण ज्यांना उत्तम डान्सर व्हायचे आहे असे लोक सातत्याने प्रयत्न करत राहतात आणि आपले सर्वोत्तम परफॉर्मन्स देतात. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चिमुकलीचे चाहते झाले आहेत.

हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत.

सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. हल्ली कधी ‘एक नंबर तुझी कंबर’, हे गाणं तर कधी ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर अनेक महिला कलाकारांच्या लावणी नृत्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु, या व्हिडीओंपैकी काही व्हिडीओंमध्ये काही महिला लावणीच्या नावाखाली त्यांच्या नृत्यातून केवळ अश्लील हावभावच दाखविताना दिसतात. फार कमी महिला त्यांच्या व्हिडीओतून साध्या व सुंदर पद्धतीने पारंपरिक लावणी सादर करतात; ज्यात कोणतीही अश्लीलता नसून, सुंदर हावभाव आणि स्टेप्स असतात. आता असाच भन्नाट व्हिडीओ समोर आलाय की, ज्यात चक्क एक लहान चिमुकली जबरदस्त लावणी सादर करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘चढविला पट्टा कमरेवरी’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी लावणी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्यावर आतापर्यंत अनेक अधिक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “कौतुक करावं तेवढं कमी ” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त” आणखी एकाने लिहिलेय, “खूपच क्यूट.”