Viral Video: हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच एका तरूणीचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
अनेकांना त्यांच्या लहानपणापासूनच नृत्याची आवड असते. त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा हौशी कलाकरांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी लावणी करताना दिसतं, तर कधी कोणी विविध सुंदर डान्स करताना दिसतात.
लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच; पण त्या लावणीमध्ये एक ठसकेबाजपणा, नजाकत असावी लागते. हल्ली सोशल मीडियामुळे एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, त्यातील काही मोजक्याच व्हिडीओंतील नृत्याच्या मोहिनीने प्रेक्षक वेडे होतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी समारंभाचे व्हिडीओ, लग्नाचे व्हिडीओ तर कधी नृत्याचे व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु, त्यातील काही मोजकेच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आलाय. ज्यात एक तरुणी खूप सुंदर लावणी करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी एका इमारतीच्या बाहेर लावणी सादर करीत आहे. यावेळी ती ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ या गाण्यावर सुंदर लावणी सादर करताना दिसतेय. तिच्या चेहऱ्यावरील सुंदर हावभाव आणि लावणी स्टेप्स पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
A post shared by Jagruti Gavale | thecurlyartist (@jagrutist)
हा व्हिडीओ @jagrutist या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज अन् अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, “किती सुंदर नाचलीस ताई” एका युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर ” आणखी एका युजरने लिहिलेय, “नादखुळा गं”, तर आणखी एकाने लिहिलंयी की, “अरे व्वा काय कमाल केली हिने”

