scorecardresearch

काश्मीरला गेलेल्या मुलीला ही गोष्ट बघायला मिळालीच नाही, पाहा हा VIRAL VIDEO

काश्मीर खोऱ्यातल्या एका गोंडस मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पोशिका असं या चिमुरडीचं नाव असून या या व्हिडीओमध्ये काश्मीरचा आढावा घेताना दिसत आहे.

kashmir-Girl-Viral-Vdeo
(Photo: Twitter/ hussain_imtiyaz )

काश्मीर खोऱ्यातल्या एका गोंडस मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पोशिका असं या चिमुरडीचं नाव असून या या व्हिडीओमध्ये काश्मीरचा आढावा घेताना दिसत आहे. “काश्मीर खूप सुंदर आहे आणि मी येथे पहिल्यांदाच भेट दिली.” असं ती या व्हिडीओमध्ये सांगताना दिसतेय. पण, खोऱ्यात बर्फ न दिसल्याने ती निराशही होत असते. एएनएन न्यूजला मुलाखत देताना या तरुणीने काश्मीरबद्दल आपले मत मांडले. एकदा हा व्हिडीओ पाहाच.

काश्मीरला भेटायला गेलेल्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला
जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी इम्तियाज हुसैन यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चिमुरडी म्हणताना ऐकू येते की, ‘माझे ध्येय फक्त बर्फाला स्पर्श करणे होते, पण आम्ही इथे आलो तेव्हा बर्फ पडला नाही. काश्मीर खूप सुंदर ठिकाण आहे आणि भाषाही खूप चांगली आहे. मला हॉटेल्स, बोटी आणि पर्वत आवडतात.” इम्तियाज हुसैन यांनी या चिमुकलीचा व्हिडीओ शेअर करत लिहिले, “अरे डिअर, हिवाळ्यात पुन्हा या. मी वचन देतो, मग बर्फ पडेल.”

आणखी वाचा : Thief Dance Video: चान्स पे डान्स! चोरी यशस्वी झाल्यानंतर चोरट्याने केला असा भन्नाट डान्स, हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : आईची मजुरी मागितली म्हणून तरूणाला पाय चाटायला लावले, बेल्ट-केबलने केली मारहाण, चीड आणणारा VIDEO VIRAL

हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. नेटिझन्स या मुलीचे खूप कौतुक करत आहेत. मुलीने आपले म्हणणे लोकांसमोर अतिशय प्रेमळपणे सांगितले. एका युजरने म्हटले की, ‘मुलीला तिच्या इंग्रजी बोलण्याच्या क्षमतेवरून तुलना करून नका, तिचा आत्मविश्वास खूप चांगला आहे’. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘ती पूर्णपणे फोकस आहे, तिला कोणीही हरवू शकत नाही. तिला बर्फ बघायचा होता. तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘पुन्हा एकदा काश्मीरला या’.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video girl who went to kashmir did not get to see this thing prp

ताज्या बातम्या