Kashi Mi Jau Mathurechya Bajari Dance Video Viral : ट्रेन, बस किंवा रस्त्यावरून चालताना आजकाल अनेकांच्या कानात इअरफोन्स दिसतात. प्रवास करताना गाणी ऐकणे, रिल्स पाहणे हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. आवडतं गाणं कानावर पडलं की, नकळत मूड फ्रेश होतो आणि मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. त्यात मराठी गाणी असली तर हा आनंद आणखी द्विगुणित होतो. म्हणूनच अनेकजण आपल्या आवडत्या मराठी गाण्यांची प्लेलिस्ट तयार करून ती वारंवार ऐकतात. त्याचप्रमाणे भन्नाट स्टेप्स असलेले डान्स व्हिडीओही सेव्ह करून ठेवतात.

सध्या असाच एक मराठमोळा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, डान्ससाठी या दोन्ही तरुणींनी बॉलिवूड गाण्याऐवजी मराठी गाण्याची निवड केली आहे. त्यामुळे त्यांच्या या सादरीकरणाचे नेटकऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे. व्हिडीओमध्ये दोघीही ‘नटरंग’ चित्रपटातील लोकप्रिय ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?’ या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर करताना दिसत आहेत. पारंपरिक कुर्ती परिधान करून त्यांनी अत्यंत सुंदर आणि मनमोहक स्टेप्स सादर केल्या आहेत.

हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा असला तरी दोन्ही तरुणींचे आकर्षक पोशाख, चेहऱ्यावरील सुंदर हावभाव, उत्साहपूर्ण सादरीकरण आणि नृत्यशैलीची झलक पाहून नेटकरी अक्षरशः भारावून गेले आहेत. त्यांच्या प्रत्येक स्टेपमध्ये असलेला ताल, समन्वय आणि आत्मविश्वास पाहून अनेकांनी कमेंट्समध्ये त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, मराठी गाण्यावर सादर केलेल्या या नृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?’ या लोकप्रिय मराठी गाण्यावर या दोन्ही तरुणींनी सादर केलेला हा मनमोहक डान्स तुम्हीही एकदा नक्की पाहा.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @swingwithme20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
व्हिडीओ पाहून नेटकरी “खूप सुंदर ताई”, “प्रेम”, “एक नंबर स्टेप्स घेतल्या आहेत”, “अप्रतिम”, “कलाकार”, “खूप छान, मराठी गाणं”, “टॉप रे! विशेषतः काळ्या ड्रेसमधील मुलीने तिच्या सुंदर शास्त्रीय नृत्याच्या हालचालींनी सर्वांची मने जिंकली” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.