Viral Video Girls Dance On Uyi Amma Song : मुलीच्या जातीने लाजून, मान खाली घालून, लाजून राहावं असं पूर्वी अगदी सहज म्हंटल जायचं. त्यामुळे उगाच लोकांना अंगावर थोपलेला नाजूकपणा दाखवावा लागायचा. पण आता अलीकडे व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओमधून मुली, महिला म्हणा किंवा अगदी लग्न झालेल्या स्त्रिया बिनधास्त, बेभान होऊन नाचताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये दोन मुलींनी गाण्यावर असा काही ताल धरला आहे की, सगळ्यांना थांबून दोन्ही मुलींचा डान्स बघणायचा मोह काही आवरत नाही आहे.

‘आझाद’ या चित्रपटातून अमन देवगण (Aman Devgan) आणि राशा थडानी(Rasha Thadani) ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील ‘उई अम्मा’ गाणं खूपच लोकप्रिय ठरलं. या गाण्यावर अनेक जणांनी स्वतःचे टॅलेंट दाखवत डान्स व्हिडीओ देखील बनवले. तर या गाण्यावर हळदीच्या कार्यक्रमात दोन मुली आनंदी होऊन मजेदार डान्स करताना दिसत आहे. कोण बघतंय, कोणाला आपण डान्स केलेला आवडतो आहे की नाही अशा कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता या मुली स्वतःची डान्स करण्याची आवड पूर्ण करताना दिसत आहेत.

“मुलींच्या परफॉर्मन्समधला आनंद बघा” (Viral Video)

‘उई अम्मा’ गाणं लागताच दोन्ही मुली एकमेकींकडे बघून डान्स करण्यास सुरुवात करतात. दोघींचे हावभाव, त्यांच्या स्टेप्स अगदी लक्षवेधी आहेत. पण, हळदीच्या कार्यक्रमाला जमलेली आणि डान्स बघणारी मंडळींना पाहून तुम्हाला काही सेकेंदासाठी वाईट वाटेल. कारण इथे जमलेली मंडळी रागाने तर किंचित काही आश्चर्याने तर अगदी किंचित महिला कौतुकाने डान्स करणाऱ्या मुलींकडे बघताना दिसत आहेत. पण, नेटकऱ्यांनी मात्र या तरुणींच्या डान्स व्हिडीओचे भरभरून कौतुक केले आहे. एकदा बघाच हळदीमध्ये दोन्ही मुलींनी केलेला जबरदस्त डान्स.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @amardancestudio007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून “मुलींचा परफॉर्मन्स करतानाचा आनंद बघा. खूपच एनर्जेटिक आणि सुंदर आहे! खरंच ओरडून टाळ्या वाजवाव्याशा वाटतात. पण, बघणारे प्रेक्षक इतके शांत आहेत हे बघून थोडं वाईट वाटलं”, “गडद लाल लिपस्टिक लावलेली जी आहे ना, ती थोडी जळतेय असं वाटतंय” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…