Viral Video: सोशल मीडिया आणि डान्स व्हिडीओ यांचं समीकरण सध्या चांगलंच लोकप्रिय झालं आहे. ट्रेंडिंग गाणं, आकर्षक डान्स स्टेप्स आणि हटके लोकेशन यांचा मेळ साधत अनेक जण रील्स तयार करताना दिसतात. काही सेकंदांचा हा व्हिडीओ आवडला तर यूजर्स तो लाईक, शेअर आणि कमेंट करत असल्याने पाहता-पाहता तो सोशल मीडियावर व्हायरल होतो. त्यामुळे डान्स ही केवळ कला किंवा मनोरंजन न राहता सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवण्याचं प्रभावी माध्यम बनलं आहे.
मुलींचा ग्रुप डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय होताना दिसतो. मैत्रिणींचा ग्रुप एकत्र येऊन ट्रेंडिंग गाण्यांवर भन्नाट डान्स स्टेप्स करत रील्स तयार करतो. एकसारख्या स्टेप्स, उत्साहपूर्ण अंदाज आणि मैत्रिणींची धमाल यामुळे असे ग्रुप डान्स व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे सोशल मीडिया, मैत्री आणि डान्स यांचं भन्नाट समीकरण पाहायला मिळतं.
या व्हिडीओमध्ये तीन तरुणी आणि दोन लहान मुली पारंपरिक वेशभूषेत चक्क जंगलाच्या सान्निध्यात ‘वादळ वारा सुटला गं’ या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहेत. आजूबाजूला हिरवाईने नटलेलं जंगल, पारंपरिक पेहराव आणि त्यावर गाण्याच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणी, असा सुंदर माहोल या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तरुणींच्या भन्नाट डान्स स्टेप्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. निसर्गरम्य वातावरणात केलेला हा भन्नाट डान्स पाहून नेटकरीही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @_mahi_659 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप भारी नाचल्या” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स.” आणखी एका युजरने लिहिलेय, “अहा, डान्स असावा तर असा”
