Viral Video: जंगलातील व्हिडीओ पाहण्याची अनेकांना विशेष उत्सुकता असते. घनदाट जंगल, हिरवीगार झाडे, शांत वातावरण आणि त्यामध्ये मुक्तपणे वावरणारे वन्यजीव यांचे दृश्य मनाला भुरळ घालते. जंगलातील प्राणी आणि पक्ष्यांचे नैसर्गिक वर्तन कॅमेऱ्यात कैद झालेले पाहणे हा अनेकांसाठी मनोरंजनाचा अनोखा अनुभव असतो. त्यामुळे जंगलातील सुंदर आणि रंजक व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात पाहिले आणि शेअर केले जातात.

जंगलातील प्रत्येक जीव एकमेकांशी अन्नाच्या माध्यमातून जोडलेला असतो. झाडे, गवत आणि इतर वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करतात. त्यांच्यावर शाकाहारी प्राणी, जसे की हरिण, ससा आणि हत्ती, अवलंबून असतात. या शाकाहारी प्राण्यांवर वाघ, बिबट्या, सिंह यांसारखे मांसाहारी प्राणी शिकारी करून जगतात. मृत प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष सूक्ष्मजीव विघटित करून त्यातील पोषकद्रव्ये पुन्हा मातीत मिसळतात. अशा प्रकारे जंगलातील उत्पादक, शाकाहारी, मांसाहारी आणि विघटक यांच्यातील संबंधातून अन्नसाखळी तयार होते आणि जंगलातील पर्यावरणीय समतोल टिकून राहतो.

सिंह हा जंगलातील शक्तिशाली आणि कुशल शिकारी म्हणून ओळखला जातो. सिंह सहसा हरण, रानडुक्कर, म्हैस, झेब्रा यांसारख्या प्राण्यांची शिकार करतो. शिकार करताना तो आपल्या ताकदीसोबतच योग्य वेळ आणि संधीचा वापर करतो. अनेकदा सिंहांचा कळप मिळून शिकार करताना दिसतो, ज्यामुळे मोठ्या प्राण्यांनाही लक्ष्य करणे शक्य होते. जंगलातील अन्नसाखळीत सिंहासारख्या मोठ्या मांसाहारी प्राण्यांची महत्त्वाची भूमिका असून, ते भक्ष्य प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

हा व्हिडीओ पाहताना काही क्षणांसाठी अंगावर काटा येतो. व्हिडीओमध्ये एक सिंह शेळीचा वेगाने पाठलाग करताना दिसत आहे. जीव वाचवण्यासाठी शेळीही धावत सुटते; मात्र अचानक ती एका ठिकाणी थांबते. शेळी थांबल्याचे लक्षात न आल्याने वेगात धावणारा सिंह तिच्या पुढे निघून जातो. शेळीच्या या अनपेक्षित युक्तीमुळे सिंहाचा अंदाज चुकतो आणि ती त्याच्या तावडीतून बचावल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Taniya (@its.taniya47)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @its.taniya47 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “म्हणूनच ती शेळी आहे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “सिंहाची जिरवली शेळीने”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “जंगलातील सर्वात सुंदर व्हिडीओ पाहिला मिळाला”