आजोबा जोमात, पाहणारे कोमात! जबराट डान्सचा हा VIRAL VIDEO पाहाच

हा व्हिडीओ एका आजोबांचा आहे. व्हिडीओमध्ये आजोबा जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. आजोबांचा हा जबरदस्त डान्स पाहून पाहणारे केवळ पाहतच राहिले. आजोबा नाचण्यात इतके मग्न झालेत की त्यांना स्वतःला भान राहिले नाही.

Dancing-Dadaji-Viral Video
(Photo; Instagram/ goodnews_movement)

अनेक वेळा सोशल मीडियावर असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे बघायला फारच मनोरंजक असतात. अनेक व्हिडीओ महिनोनमहिने मनात आपली छाप सोडतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका आजोबांचा आहे. व्हिडीओमध्ये आजोबा जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. आजोबांचा हा जबरदस्त डान्स पाहून पाहणारे केवळ पाहतच राहिले. आजोबा नाचण्यात इतके मग्न झालेत की त्यांना स्वतःला भान राहिले नाही.

हल्ली वयाची तिशी ओलांडली की व्यक्ती त्यांच्या हौस मौज करणं विसरून जातात. आता आमचं वय झालं असं मस्करीत बोलून आयुष्य जगण्याची खरी मजाच ते घेत नाहीत. पण या व्हिडीओमधल्या आजोबांना पाहून तुम्ही आश्चर्य व्हाल. विदेशी आजोबांचं या व्हिडीओमध्ये जबराट डान्स करताना दिसत आहेत. आजोबांचे वय झालेले असले तरी त्यांच्या मनातील तरूण पाहून सारेच जण थक्क होऊ लागले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालाय. हा व्हिडीओ तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल.

या व्हिडीओमध्ये टोपी, निळा शर्ट आणि काळी पँट घातलेले आजोबा साउथपोर्ट, यूके इथल्या रस्त्यावर नाचत आहे. डान्स करताना हे आजोबा इतके बेभान होऊन जातात की की त्यांना जगातील कोणाचीही पर्वा राहत नाही. मॅकेरेना आणि मायकेल जॅक्सनच्या थ्रिलरसह अनेक गाण्यांवर या आजोबांनी अप्रतिम डान्स केलाय. आजोबा शेवटी शकीराच्या ‘वाका वाका’ आणि बियॉन्सेच्या ‘क्रेझी इन लव्ह’वर थिरकू लागतात. त्यांचा स्टायलिश डान्स कोणत्याही तरुण डान्सर्सपेक्षा कमी नाही.

आणखी वाचा : चमत्कार! पाण्याबाहेर पडताच काचेसारखा पारदर्शी होतो हा मासा; पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मोबाईल फोडून न जाणो काय दाखवत होता, पण पुढे जे घडलं ते पाहून हैराण व्हाल, पाहा हा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘गुडन्यूज मूव्हमेंट’ पेजने शेअर केला आहे. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. या व्हिडीओला आतापर्यंत २.३ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आणि १००K लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘यूकेच्या साउथपोर्टमध्ये या आजोबांना नाचताना पहा.’

या व्हिडीओसोबत एक महत्त्वाचा संदेशही शेअर केला आहे, ‘लक्षात ठेवा, स्वत:ला जास्त गंभीरपणे घेऊ नका, कारण इतर कोणीही स्वत:ला इतके गंभीरपणे घेत नाही.’ हा व्हिडीओ लोक वारंवार पाहताना दिसून येत आहेत. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video grandfather won the hearts of millions of people with a bang dance prp

Next Story
हे लग्न कसं लागलं पाहिलं का?; सोशल मीडियावर Viral होतोय TV मालिकेमधील ‘हा’ सीन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी