Viral Video: सोशल मीडियाचे वेड फक्त लहान मूलं किंवा तरुण पिढीलाच नाही तर अनेक वृद्ध महिला आणि पुरुषांनादेखील लागलेले आहे. अनेकदा ही वृद्ध मंडळी तरुणांनाही लाजवेल असा रील्स बनवताना तसेच डान्स करताना दिसतात. एकीकडे काही वृद्ध मंडळी तरुणाईला सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देतात, तर दुसरीकडे काही वृद्ध व्यक्ती तरुणांसोबत सोशल मीडियावर रील्स बनवताना दिसतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात लाखो व्ह्यूज मिळवतात. आतादेखील अशाच एका आजींचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

वय, परिस्थिती काहीही असो, जगताना आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटता आला पाहिजे. असे खूप कमी लोक असतात जे आयुष्यातील दुःख, वेदना विसरून आनंदाने जगतात. या व्हायरल होणाऱ्या आजीदेखील जवळपास ८० हून अधिक वयाच्या आहेत, तरीही त्यांच्यातील उत्साह एखाद्या तरुणीला लाजवेल असा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजी एका तरुणासोबत “मुझसे अब दूर ना जा” या गाण्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. यावेळी आजींचा लूकदेखील पाहण्यासारखा आहे; शिवाय त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशनचेदेखील अनेक जण कौतुक करताना दिसत आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओला ट्रोल करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: ‘गुलाबी साडी’ गाण्याची शिक्षकालाही भुरळ; भरवर्गात विद्यार्थ्यांसोबत केला जबरदस्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी करतायत एक्स्प्रेशन्सचे कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने, अहो थांबा थांबा आजीबाई, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @TheJatKshatriya या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “अरे बापरे, हे काय सुरू आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “दात पडतील आजी तुमचे”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “आजकाल काय पाहायला मिळेल सांगता येत नाही”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “मस्त आहेत आजी.”

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा अनेक वृद्ध मंडळींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यातील एका व्हिडीओत एक आजीबाई पाण्यात उडी मारून पोहताना दिसल्या होत्या, तर कधी बाईक चालवताना दिसल्या होत्या.