Viral Video Groom Bows to His Friends at Wedding : लग्न म्हणजे आयुष्याची नवी सुरुवात असते असे म्हणतात. मुलगा आणि मुलगी दोघांच्याही आयुष्यात मोठे बदल होतात. वर्षानुवर्षाचं हक्काचं घर सोडून नवऱ्याच्या घरी मुलीला यावं लागतं. तर मुलाला बायकोची काळजी घेताना, तिच्याकडे लक्ष देताना आपल्या माणसांपासून नकळत दूर व्हावं लागतं. खास करून मित्र-मंडळी. तर या सगळ्याची जाणीव त्यांना कुठेतरी असतेच. तर आज सोशल मीडियावर नवरदेवाला कदाचित याच गोष्टीची जाणीव झाली आणि तो ढसाढसा रडू लागला.
लग्नानंतर आयुष्य बदलते, जबाबदाऱ्या वाढतात आणि आधीसारखे दिवस किंवा क्षण पुन्हा तसे राहणार नाहीत. त्यामुळे नवीन आयुष्याची सुरुवात करण्याच्या दिवशी, नवरदेवाने त्याला अत्तापर्यंत साथ देणाऱ्या लोकांचा सन्मान केला. लग्नाच्या वेळी त्याने आपल्या जवळच्या मित्रांसमोर नम्रपणे वाकून आदर दिला. हे तेच मित्र होते जे त्याच्या आयुष्यातील अडचणी, बदल, अपयश आणि यश या सगळ्या काळात त्याच्या बरोबर उभे राहिले होते. हा क्षण प्रसिद्धीसाठी नव्हता, तर त्यांच्या निष्ठा, मैत्री आणि निःस्वार्थ साथीसाठी होता. हा प्रसंग पाहून लग्नातील पाहुणे भावूक झाले. यामुळे सगळ्यांना आठवण झाली की, खरी मैत्रीही प्रेमाइतकीच महत्त्वाची असते.
फक्त मित्र नाहीत, भावांपेक्षाही जास्त आहेत (Viral Video)
नवरदेवाचे मित्र रिसेप्शनच्या वेळी त्याच्याबरोबर फोटो काढायला जातात. फोटो काढून झाल्यानंतर तो सगळ्या मित्रांना रांगेत उभा करतो. त्यानंतर सगळ्या मित्रांसमोर वाकून, गुडघ्यावर बसून तो डोकं टेकवतो आणि सगळ्यांचे आतापर्यंत साथ दिल्याबद्दल आभार मानतो. एवढंच नाही जेव्हा तो उठून उभा राहत असतो तेव्हा नकळत भावूक होतो आणि ढसाढसा रडायला लागतो आणि एकेक करून प्रत्येकाला मिठी मारतो; जे पाहून सगळे मित्र रडायला लागतात. एकदा बघाच भावूक करणारा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @funnybr0 आणि @updatedbharat.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी ““ते फक्त मित्र नाहीत, भावांपेक्षाही जास्त आहेत. गरज पडली तर ते त्याच्यासाठी जीवही देतील”, “तुम्ही लोक करा किंवा नका करू, पण हा क्षण माझ्या लग्नात नक्की होणार. लव्ह यू रे सगळ्यांनो. सगळ्यांसाठी धन्यवाद” तर काही जण मित्रांना टॅग “तू जर असं करणार अशील तरच आम्ही लग्नाला येणार” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…

