Groom Dhurandhar style entry at wedding viral video : लग्न म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते ती पारंपरिक वरात, बँड-बाजा आणि थोडाफार नाच. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये नवरदेवाने लग्नातच फिल्मी रंग भरून टाकला आहे. एखाद्या सिनेमातील हिरो जसा एंट्री घेतो, तशीच एंट्री या नवरदेवाने घेतल्यामुळे तो व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. FA9LA या ट्रेंडिंग गाण्यावर नवरदेवाची स्वॅगमध्ये घेतलेली एंट्री पाहून अनेक जण फिदा झाले आहेत, तर काहींनी गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्न सोहळ्यातील आहे. इन्स्टाग्रामवर @beingshoaibqureshi या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये नवरदेव आपल्या लग्नात पारंपरिक शांत एंट्री न घेता, सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असलेल्या FA9LA गाण्यावर भन्नाट डान्स करत एंट्री घेताना दिसतो. नवरदेवाचा आत्मविश्वास, स्टाईल आणि मोकळेपणा पाहून हा व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओमध्ये नवरदेव संपूर्ण स्वॅगमध्ये डान्स करत पुढे येतो. त्याचे एक्स्प्रेशन्स, हातवारे आणि चाल एखाद्या फिल्मी हिरोसारखी वाटते. विशेष म्हणजे नवरदेवाचे मित्रही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये त्याच्या मागे स्टेप टू स्टेप डान्स करताना दिसतात. यामुळे नवरदेवाची एंट्री आणखी दमदार झाली आहे. कॅमेरामनही पूर्ण एनर्जीमध्ये शूटिंग करत असल्यामुळे व्हिडीओ पाहताना थरार जाणवतो. वरातीतले लोकही नवरदेवाचा हा अंदाज पाहून टाळ्या वाजवताना आणि नाचताना दिसतात.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हायरल होताच प्रतिक्रियांमध्ये अनेकांनी भरभरून कौतुक केलं आहे. काही युजर्सनी नवरदेवाच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं, तर काहींनी थेट टोमणे मारले. एका युजरने लिहिलं, “आमच्याकडे असते तर म्हणाले असते नवरदेव नशेत आहे!” दुसऱ्याने म्हटलं, “कॅमेरामनची एंट्री पण भारी होती.” तिसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिली की , “नवरदेव हवा तर असाच, पूर्ण स्वॅग!”

तर काहींनी गमतीने लिहिलं, “आमच्या घरात असं झालं असतं तर लग्नच मोडलं असतं.” एकाने तर थेट इशाराच दिला, “आज नाचून घे, उद्यापासून बायकोच्या तालावरच नाचायचं आहे.” हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धमाल उडवत आहे. काहींसाठी ही एंट्री भन्नाट आहे, तर काहींसाठी थोडी जास्तच फिल्मी; पण एवढं मात्र नक्की की हा व्हिडीओ पाहून कुणीही दुर्लक्ष करू शकत नाही!