Viral Video: समाजमाध्यमांवर डान्स, गाणी, विनोद यांसारख्या विविध विषयांवरील व्हिडीओ व्हायरल होतात, तसेच यावर लग्नाचेदेखील अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. लग्नातील या व्हिडीओंमध्ये अनेक गमतीजमती पाहायला मिळतात. ज्यात कधी विनोदी घटना घडलेल्या दिसतात, तर कधी वादविवाददेखील पाहायला मिळतात. सोशल मीडियावर अशा घटना तुफान व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. लग्न म्हटलं की, त्यात रुसवे-फुगवे, मजामस्ती पाहायला मिळतेच. हल्ली असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. मागील काही दिवसांपूर्वी एका लग्नातील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एका वधूने तिच्या पतीने तिला जबरदस्ती पेढा भरवल्यामुळे त्याच्या कानाखाली मारली होती. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत असं काहीतरी झालं, ज्यावर वैतागून नवरदेवाने एका व्यक्तीला लाथ मारल्याचे दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न पार पडल्यानंतर स्टेजवर वधू आणि वर हात जोडून उभे राहतात. पण, यावेळी स्टेजखाली उभ्या असलेल्या नवरदेवाच्या मित्राने पार्टी पॉपर्स नवरदेवाच्या दिशेने उडवला, ज्यामुळे त्याचा धूर नवरदेवाच्या तोंडावर उडाला. यामुळे नवरदेव चिडतो आणि रागात सर्वांसमोर खाली उभ्या असलेल्या मित्राला जोरात लाथ मारतो. नवरदेवाचं हे कृत्य पाहून वधूदेखील चकित होते. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @anupmayadav732000ggg या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर साठ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, "आधी हात जोडले आणि लगेच पायाने लाथपण मारली." तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, "नवरदेवाचं वागणं पाहून नवरीपण घाबरली." तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, "असा कसा नवरदेव आहे, त्याला मजाकपण आवडत नाही." तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, "अरे हा वेडा आहे वाटतं." हेही वाचा: बापरे! सिंहाच्या शावकांचा पाणघोड्यावर क्रूर हल्ला… Viral VIDEO पाहून उडेल थरकाप पाहा व्हिडीओ: दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नातील असे अनेक व्हिडीओ खूप व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडीओमध्ये नवरदेवाचे काही मित्र गुलाबी साडी या गाण्यावर डान्स करताना दिसले होते, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये रसगुल्ला खाण्यावरून पत्नीने तिच्या पतीला मारहाण केली होती.