Viral Video: हा हळदी समारंभ पाहून ‘हेच पहायचं बाकी होतं’ अशीच तुमची पहिली प्रतिक्रिया असेल

सध्या सोशल मीडियावर या हळदी समारंभाची जोरदार चर्चा सुरुय

Viral Video of Haldi

करोना लॉकडाउन आणि वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेचा वापर वाढला आहे. अगदी कामापासून ते टाइमपासपर्यंत अनेक गोष्टींसाठी सध्या इंटरनेटचा वापर अगदी शहरांपासून गावांपर्यंत सगळीकडेच वाढलाय. त्यातही इंटरनेटवर करोनासंदर्भातील चर्चा, बातम्या, फोटो, व्हिडीओ यांचा खच पडलाय असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मात्र याच लॉकडाउनमुळे लग्नसमारंभांवर बंधन आलीय. तरीही अनेक ठिकाणी नव्या करोना नियमांचे पालन करुन लग्न लावली जात आहेत. हॉलमधील मर्यादित वऱ्हाडी, मर्यादित कालावधी आणि इतर नियमांचे पालन केलं जात आहे. मात्र त्याचबरोबर लग्न घरीही नियमांचं पालन करण्यासाठी काय जुगाड केले जात आहेत हे दाखवणारा एका व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका नवऱ्या मुलाला हळद लावली जात आहे. मात्र करोनामुळे नवऱ्या मुलाला थेट हाताने हळद लावलण्याऐवजी लांब बांबूला रंगकाम करताना वापरण्यात येणारा स्पंजला रोलर लावण्यात आलाय. बांबूच्या सहाय्याने हा रोलर हळदीच्या वाडग्यात बुडवून एखादी भिंत रंगवावी तशापद्धतीने नवरदेवाला हळद लावली जात आहे. हा व्हिडीओ अनेक अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी मजेदार कमेंट्सही दिल्या आहेत. काहींनी ही फक्त नाटकं असल्याची टीका केलीय तर काहींनी एवढीच करोनाची काळजी होती तर नवरदेवाने मास्कही घालायला हवं होतं, असं म्हटलं आहे. एकीकडून टीका होत असतानाच दुसरीकडे या व्हिडीओवर मजेदार आणि गंमतीशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडलाय. लग्न थोडं पुढे ढकलता आलं असतं, ही सोशल डिस्टन्सिंग हळद आहे, हळद लावताय की एशियन पेंट?, याला नो टच हळद म्हणता येईल, हे पाहून माझ्या लग्न करण्याचा अपेक्षा वाढल्यात, हे फक्त भारतातच शक्य आहे या आणि अशा शेकडो कमेंट्स या व्हिडीओवर करण्यात आल्या आहेत. पाहुयात यापैकी काही निवडक कमेंट्स…

सोशल डिस्टन्सिंग पाळून हळद

जसा काळ तशी शक्कल

नो टच हळद

माझ्या अपेक्षा वाढल्या

लग्न पुढे ढकला ना

हेच पहायचं बाकी होतं

सोशल डिस्टन्सिंग हळद

करोनाचा गंमत करुन ठेवलीय

हे फक्त भारतातच शक्य आहे

हळद आहे की पेंट

जुगाड भारीय

लॉकडाउन लग्न

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, तो नवरा मुलगा कोण आहे यासंदर्भातील माहिती समोर आलेली नसली तरी हा व्हिडीओ नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे हे मात्र नक्की.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Viral video haldi ceremony by maintaining social distance during corona times scsg

ताज्या बातम्या