Viral Video: काही जण दिसायला जरी लहान असले तरीही त्यांचे कतृत्व इतरांपेक्षा मोठे असते, त्यामुळे कधीच कोणाला हलक्यात घेऊ नका. समोरच्या व्यक्तीला कमकुवत समजून अनेक जण त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात आणि तोंडावर पडतात. ही मानसिकता मनुष्यांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही पाहायला मिळते. आजपर्यंत तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात कमकुवत प्राण्यांना आपली ताकद दाखवण्याच्या नादात सिंह, वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणीही तोंडघशी पडतात. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका मांजरीबरोबर असंच काहीतरी घडल्याचे पाहायला मिळत आहे.

समाजमाध्यमांमुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्या नजरेस पडतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांशी भांडताना दिसतात किंवा एकमेकांसोबत खेळताना दिसतात. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Meenakshi Seshadri
“चित्रपटाच्या करारावर सही…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या ‘त्या’ गोष्टीमुळे कोसळले होते रडू; मीनाक्षी शेषाद्री आठवण सांगत म्हणाली, “त्यामुळे मी रडत…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
vidya balan reveals kartik aaryan love life
कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शेतामध्ये मांजरीला खेकडा दिसतो. खेकड्याला पाहिल्यावर मांजर त्याला आपल्या तोंडाने पकडायला जाते, इतक्यात खेकडा आपल्या नांगीने मांजरीच्या तोंडाला पकडतो. खेकड्याने मांजरीच्या तोंडाला पकडल्यामुळे मांजरीला खूप वेदना होतात. ती खेकड्यापासून सुटका करण्यासाठी इकडे-तिकडे पळते. या व्हिडीओमध्ये मांजरीला खेकड्याबरोबर केलेली मस्ती चांगलीच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे कधीही कोणाला कमी समजू नये, ही शिकवण मिळत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ejazky78 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सहा मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि नव्वद हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “आई घरी वाट बघत असेल…” प्रसिद्धीसाठी तरुणांचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओवर एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “याला बोलतात स्वतःच्या पायावर दगड मारून घेणं.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “जसे करावे तसे भरावे.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “नको तिथे मस्ती करायला गेल्यावर असंच होणार.” चौथ्या युजरने लिहिलेय, “हे पाहून मी खूप हसलो.”