Viral Video: केरळमध्ये पावसाचा हाहाकार; क्षणार्धात संपूर्ण घराला जलसमाधी

केरळमध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत होता. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे.

Heavy rains in Kerala
एका क्षणार्धात पूर्ण घर नदीत बुडाले (फोटो: ANI)

केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. राज्यातील कोट्टायम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एक घर नदीत वाहून गेले. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे, ज्यामुळे २१ लोकांचा मृत्यू झाला आहे. व्हायरल धक्कादायक व्हिडीओमध्ये असे दिसून येते की नदीच्या काठावर उभे असलेले दोन मजली घर प्रथम हळूहळू एका बाजूला झुकते. मग अचानक संपूर्ण घर नदीत पडते.

रात्रभर पाऊस

अपघाताच्या वेळी घर रिकामे होते, काही लोक त्या वेळी जवळच उभे होते. केरळमध्ये रात्रभर संततधार पाऊस पडत होता, परंतु राज्याच्या बहुतांश भागात सकाळपर्यंत तीव्रता कमी झाली होती. कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर कोट्टायममध्ये १२ जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाशिवाय, लष्कर, नौदल आणि हवाई दलही बचाव कार्यासाठी उतरले आहेत.

( हे ही वाचा: समजून घ्या: ‘स्क्विड गेम’ नक्की आहे तरी काय?; जगभरात का आहे त्याची चर्चा? )

पंतप्रधानांचे ट्विट

त्याचवेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राज्याच्या मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीबाबत चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले, “केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोललो आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर चर्चा केली. जखमी आणि प्रभावितांना मदत करण्यासाठी अधिकारी कार्यरत आहेत.”

( हे ही वाचा: Viral Video: तंदूरमध्ये रोटी चिकटण्यासाठी थुंकी लावणाऱ्या विकृताला अटक, गाझियाबादमधली घटना)

पुढे पीएम मोदी म्हणाले, “मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.’ त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, “केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे काही लोकांचा मृत्यू झाला हे दुःखद आहे. पीडित कुटुंबासोबत माझ्या संहवेदना आहेत.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video heavy rains in kerala the whole house was submerged in an instant ttg

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या