Homeless Kid Spends Own Money To Buy Bhel Puri Viral Video : आपल्यापैकी अनेकांचा असा विश्वास आहे की, पैसा आनंद विकत घेऊ शकतो. आनंदी राहण्यात पैशाची मोठी भूमिका आहे असे मानणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. पण तुम्ही श्रीमंत की गरीब हे पैशांवरून नाही तर तुमच्यातला वागणुकीवरून कळते. रस्त्यावरील तरुणी आणि एका कंटेंट क्रिएटरचा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामुळे लाखो लोकांना आठवण झाली आहे की, चांगलूलपणाचा संपत्तीशी काहीही संबंध नसतो.

कंटेंट क्रिएटर रितिका शर्मा रस्त्याच्या कडेला असलेल्या भेळ पुरीच्या स्टॉलजवळ उभी असते. तेव्हा मुस्कान नावाची एक तरुणी तिच्याकडे कळकळीची विनंती करून भेळ पुरी घेऊन दे असे नकळत म्हणते. तेव्हा रितिका समजावून सांगते की, तिच्याकडे भेळपुरी घेण्यासाठी पैसे नाहीत, तेव्हा परिस्थिती भावनिक वळण घेते. मग मुस्कान क्षणाचाही विचार न करता तिच्या छोट्या खिशात हात घालते, तिने बचत करून ठेवलेले पैसे काढते आणि भेळपुरी विक्रेत्याला देते आणि ताईसाठी भेळपुरी बनव असं अगदी हक्काने सांगते.

दया आणि करुणा बँक बॅलन्सवर अवलंबून नसते (Viral Video)

जेव्हा रितिका मुलीच्या पैशांनी भेळपुरी खाण्यास करण्यास नकार देते, तेव्हा निष्पाप मुस्कान तिच्या हृदयाला भिडणारी गोष्ट म्हणते. “जर तू खाल्ली नाहीस तर मी मरेन” हे शब्द ऐकायला जरी गंभीर वाटतं असले तरीही या वाक्यांमध्ये खरं प्रेम, काळजी या गोष्टी अधोरेखित होत आहेत. रस्त्यावरील मुलासाठी, प्रत्येक रुपये मौल्यवान असतात. पण, मुस्कानने पैशांपेक्षा एखाद्याच्या चेहऱ्यावरील हास्य जपण्याचा निर्णय घेतला. एकदा बघाच डोळ्यांत पाणी आणणारा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @fun_factorss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. नेटकरी कमेंट सेक्शनमध्ये मुलीचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ केवळ एक गोड क्षण नाही तर समाजासाठी एक शक्तिशाली धडा आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की दया आणि करुणा बँक बॅलन्सवर अवलंबून नसते. हा छोटासा पण शक्तिशाली हावभाव सिद्ध करतो की जगातील सर्वात मोठे हृदय बहुतेकदा वयाने लहान असणाऱ्या मुलांमध्ये असते.