scorecardresearch

Video: महामार्गावर अपघाताचा थरार; भरधाव कारचा टायर फुटला अन्..

Viral Video: धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत

viral video horrible accident
महामार्गावर अपघाताचा थरार (Photo – Twitter)

आजकाल सोशल मीडियावर अनेक धक्कादायक अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील काही अपघात असे असतात जे पाहून अनेकांच्या अंगावर शहारे येतात. रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना सगळीकडे लक्ष असणं गरजेचं आहे. कारण इथे कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. अनेकदा लोकांची स्वत:ची चुक नसताना दुसऱ्यांच्या चुकीमुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. सध्या अशाच एका धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

अपघाताचा थरार –

हा अपघाताचा व्हिडीओ एका महामार्गावरील असून महामार्गावर भरधाव वेगात चाललेल्या एका वाहनाचा टायर फुटुन शेजारी असलेल्या दुसऱ्या भरधाव गाडीवर जातो आणि पुढे भीषण अपघात होतो. हा टायर प्रचंड वेगात शेजारच्या गाडीखाली आल्यामुळे ती गाडी अक्षरशः उलटी होते. हा सर्व प्रकार मागून येणाऱ्या गाडीत बसलेल्या एका व्यक्तिच्या मोबाईलमध्ये शूट झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडी लांबच्या लांब पलटी होत रस्त्याच्या कडेला उडाली आहे. एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील अपघात पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महामार्गावर भरधाव वेगात चाललेल्या एका वाहनाचे टायर गळून पडल्याने शेजारी चाललेल्या एका कारचा अपघात होतो. त्यानंतर कार पलटी होते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पाहा थरारक व्हिडीओ –

हेही वाचा – आता कहरच झाला! महिलेनं सांबरसोबत खाल्ला समोसा; नेटकरी विचरतात हा कुठला फूड कॉम्बो ?

हा व्हिडीओ Chaudhary Parvez नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी गाडी चालवताना सावधान राहा असा सल्ला दिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 13:33 IST

संबंधित बातम्या